भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
कर्जत येथील शिवालय येथील कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपाचे रामदास घरत तसेच पिंपळोली ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यांचे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश झाले.यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर,माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,रायगड जिल्हा उप प्रमुख नितीन सावंत,रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुवर्णा जोशी, कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, कर्जत तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर,तालुका संघटक बाबू घारे,माधव कोळंबे,महिला आघाडी संघटक करुणा बडेकर,कर्जत पंचायत समिती माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत,उप तालुका प्रमुख दशरथ भगत,माजी सरपंच प्रमिला बोराडे,जगदीश ठाकरे,तसेच संपत हडप,कर्जत शहर प्रमुख निलेश घरत,सरपंच बाळू सावंत, महिला आघाडी उप तालुका संघटक सुमन लोंगले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी पक्षाचे सरचिटणीस रामदास किसन घरत हे कर्जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक असून त्यांच्यासह समाधान कडू, अशोक हिंदोळा, प्रकाश फाले, तुषार केवारी, अविनाश केवारी,प्रेम केवारी, राम भगत, निखिल पारधी,प्रतीक घुडे, प्रल्हाद पिंगळे,गणेश लुंगे,प्रथमेश पिंगळे, डॉ. सुपे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला.तसेच बाबू घारे यांच्या माध्यमातून पिंपळोळी ग्रामपंचायत मधील हेमंत सोनावले, किरण सोनावले, धर्मेंद्र सोनावले, केतन सोनावले, विरेन सोनावले,महेश सोनावले ,प्रकाश जोगळे या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केले.
यावेळी रामदास घरत यांनी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांनी मला सन्मान दिला होता आणि त्यामुळे शिवसैनिकांनी आपल्याला हाक दिल्यावर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा आणि तळागाळातील जनतेत राहून काम करणारा पक्ष आहे आणि मला सर्वसामान्य जनतेचे काम करण्याचे असल्याने या पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.






