Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’, फडणवीसांच्या ‘काँग्रेस बुडते जहाज’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

लहान पक्षांचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला ‘बुडते जहाज’ असे संबोधले. यावरून आता काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून "भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’' असल्याचे म्हंटले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 12, 2026 | 08:45 PM
भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’, फडणवीसांच्या ‘काँग्रेस बुडते जहाज’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर
Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राज्यातील राजकारणात काही लहान पक्षांचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेसला ‘बुडते जहाज’ असे संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की, जरी विरोधी पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले, तरी त्याचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होईल. नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला. यावरून आता काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून “भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’’ असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चांनीही पक्षाच्या २७ व्या स्थापना दिनाच्या सुमारास जोर धरला होता. काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी असा दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आला होता; या विधानानंतर या चर्चेने अधिक जोर धरला.

आमदार नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “शरद पवार यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु काही कारणांमुळे त्यावर पुढे कोणतीही प्रगती होऊ शकली नाही. देशभरातील समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तृणमूल काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या दिशेने विचार करत आहेत.” मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हे दावे फेटाळून लावले.

‘प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध,’ मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बुडत्या जहाजावर स्वार न होण्याइतपत ते शहाणे आहेत. काँग्रेस हे बुडते जहाज आहे आणि प्रादेशिक पक्ष आपले भविष्य त्याशी जोडण्याची इच्छा बाळगतील, असे वाटत नाही. जरी विरोधी पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही; उलट, त्यामुळे पक्षासाठी अधिक राजकीय संधी निर्माण होतील. “जर त्यांनी विलीनीकरण केले, तर तो आमचा फायदाच आहे, नुकसान नाही. विरोधक आपली स्वतंत्र ओळख जितकी गमावतील, तितकी भाजपसाठी राजकीय जागा मोकळी होईल. सध्या आम्ही ‘वाट पाहा हे धोरण अवलंबत आहोत.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सकपाळांचा पलटवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते यावेळी म्हणाले, “काँग्रेस पक्ष या देशाची आशा आहे,. काँग्रेस पक्ष या देशाचा डीएनए आहे आणि भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच आव्हान देऊ शकतो. आणि २०१४ मध्ये जे काँग्रेसमुक्त भारत करण्याचा वल्गना करत होते, त्यांचा पक्षच आज काँग्रेसयुक्त झाला आहे. फडणविसांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतील. भाजपा मात्र मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’ आहे,” असे सपकाळ म्हणाले.

Maharashtra Politics: ‘काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज’; विरोधी पक्षांच्या विलीनीकरणावर मुख्यमत्र्यांचा घणाघात; म्हणाले, भाजपलाच…

Web Title: Harshvardhan sakpal slams cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
2

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा
3

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
4

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.