Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप,” हर्षवर्धन सकपाळ यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

इंधन दरवाढीवरून देशभरात संतापाचे वातावरण असतानाच विरोधक केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा या विषयावरून भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 07:55 PM
Harshvardhan Sakpal slams PM Narendra Modi over Petrol Diesel shortage and price hike, Harshvardhan Sakpal slams PM Narendra Modi. Petrol Diesel shortage, Petrol Diesel price hike,

Harshvardhan Sakpal slams PM Narendra Modi over Petrol Diesel shortage and price hike, Harshvardhan Sakpal slams PM Narendra Modi. Petrol Diesel shortage, Petrol Diesel price hike,

Follow Us
Follow Us:

इंधन दरवाढीवरून देशभरात संतापाचे वातावरण असतानाच विरोधक केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा या विषयावरून भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे,” अश्या शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.

“कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे. इंधन दरवाढ व टंचाई हे नरेंद्र मोदी यांचेच पाप आहे,” असा घणाघाती हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “२०१४ साली सत्तेत आल्यापासूनच मोदी सरकारने इंधनाचे भाव सातत्याने वाढवले आहेत. यातून सरकारी तेल कंपन्या व रिलायन्स तसेच नायरा या खाजगी तेल कंपन्यांनी भरमसाठ नफा कमावला आहे. मोदी सरकारने तेलासाठी रिझर्व्ह फंड तयार केला असता तर ही वेळ आली नसती पण कंपन्यांचे हित लक्षात घेतले, हा मोठा भ्रष्टाचारच आहे. इंधन व गॅस चंटाईचा मोठा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, छोटे उद्योगधंदे व घरातील स्वयंपाकालाही बसला आहे. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळेच अर्थव्यवस्था कोलमडली आहे,” असेही सपकाळ म्हणाले..

३००० रुपयानेच शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी करा

“कांद्याप्रश्नी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ भेटले पण महाराष्ट्राला त्यांनी वाटाण्याच्या अक्षताच दिल्या. सरकार १५०० रुपयाने कांदा खरेदी करण्याचे सांगत आहे पण ३००० रुपये प्रति क्विंटल भाव व नाफेडमार्फत कांदा खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी केला पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदी २०१४ साली नाशिकला आले होते, मी कांदा खाल्ला आहे, तुमच्याशी बेईमानी करणार नाही, सत्तेत आलो की २४०० रुपये भाव देणार असे आश्वासन दिले होते, तीच री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओढली होती पण आता मात्र ते फक्त १५०० रुपये भाव देण्याची भाषा करत आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुन्हा आंदोलन करु,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

“पंतप्रधान मोदी ‘पनौती’ तर मुख्यमंत्री फडणवीस ‘खोटारडे’,” हर्षवर्धन सपकाळ यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

बकरी ईदच्या निमित्ताने दंगली भडकवण्याचा डाव

“देशात दंगली घडवून पुन्हा २०२९ साली सत्तेत यायचे हे भाजपाचे षडयंत्र असून बकरी ईदच्या निमित्ताने जे वातावरण निर्माण करण्यात आले, ही त्या दंगलीची एक चुणूक होती. प्रत्येक सण उत्सवात हिंदू मुस्लीम मुद्दा आणायचा आणि धार्मिक वातावरण बिघडवायचे हा भाजपाचा अजेंडा आहे. तर दुसरीकडे बकरी ईद प्रश्नी भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे,” असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिले.

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ

Web Title: Harshvardhan sakpal slams pm narendra modi over petrol diesel shortage and price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • narendra modi
  • Petrol diesel price

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार की टॅक्स कमी करणार?
1

Petrol-Diesel Price: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार की टॅक्स कमी करणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर…
2

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर…

Ketan Agarwal Murder Case: ‘…बेटा, तुला न्याय मिळाला…!,’ केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आईची पंतप्रधानांकडे कठोर शिक्षेची मागणी
3

Ketan Agarwal Murder Case: ‘…बेटा, तुला न्याय मिळाला…!,’ केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आईची पंतप्रधानांकडे कठोर शिक्षेची मागणी

‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.