संग्रहित फोटो
राज्याच्या राजकीय वातावरणात आत पुन्हा एकदा खळबळ माजल्याचे दिसत येत असून देशभरात सुरु असलेल्या इंधन तुटवडा आणि इंधन दरवाढीवरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करत असल्याचे दिसत आहे. अश्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख ‘पनौती’ तर मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘खोटारडे’ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून आता यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे,” असे म्हणत सरकारने केलेल्या या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली दादर येथे आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी रास्ता रोको करून लोकांना मेलोडी चॅाकलेट वाटप केले तसेच नरेंद्र मोदी सरकार व फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “पेट्रोल नाही, डिझेल नाही, सिलेंडर गायब आहे, इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, शेतमालाला भाव नाही, जनता हवालदिल आहे पण भाजपा सरकार मात्र मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी पनौती आहेत, ते सत्तेत आल्यापासून देशातील जनतेवर वरंवडा फिरवत आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आहे असे जर त्यांना वाटत असेल तर जनता भर दुपारी कडक उन्हात पेट्रोल पंपावर काय ऊन खायला रांगा लावत आहेत का, कोणी साठेबाजी केली असे त्यांना वाटत असेल तर कारवाई केली पाहिजे,” असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले
“कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीने मोठे आंदोलन केले, तीन तास रास्ता रोको करण्यात आला. भाजपा महायुती सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांची एकजूट व ताकदी पाहून फडणवीस सरकार हादरले म्हणूनच आज तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे पण या बैठकीतून रिकाम्या हाताने परत येऊ नका, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान






