Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाईत भाजपची आक्रमक रणनीती; मकरंद पाटील यांना दिले थेट आव्हान

वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच अंतर्गत स्पर्धेची ठिणगी पडल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 01:16 PM
Intense Politics in the Wai Assembly Constituency Rural Development Minister Jaykumar Gore's Aggressive Strategy

Intense Politics in the Wai Assembly Constituency Rural Development Minister Jaykumar Gore's Aggressive Strategy

Follow Us
Follow Us:
  • महायुतीतील घटक पक्षांमध्येच अंतर्गत स्पर्धेची ठिणगी
  • वाई विधानसभा मतदारसंघात जोरदार राजकारण
  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आक्रमक रणनीती
Satara Political News : सातारा : वाई विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीतील घटक पक्षांमध्येच अंतर्गत स्पर्धेची ठिणगी पडल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने वाईमध्ये नवोदित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करत संघटनात्मक विस्ताराचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. या कार्यक्रमामागे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आक्रमक रणनीती कार्यरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विशेष म्हणजे, हा विस्ताराचा प्रयत्न थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात होत असल्याने या हालचालींना अधिकच राजकीय धार प्राप्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभांमधून नेमके काय संदेश दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मकरंद आबांच्या प्रभाव क्षेत्रातच भाजपने जाहीर मेळावे घेण्याचा निर्णय घेतल्याने हा केवळ संघटन विस्तार नसून थेट राजकीय आव्हान असल्याचे स्पष्ट होत आहे.

बावडा, पळशी, मांढरदेव आणि जांब यांसारख्या भागांमध्ये हालचाली केल्यानंतर आता वाई शहरात मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी ही पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखलेली रणनीती मानली जात आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी आळीपाळीने मतदारसंघात सक्रिय राहून स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे वाईतील पारंपरिक राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा : चारित्र्यावरुन संशय अन् मारहाण; वडगाव मावळमध्ये जोडीदारानेच घेतला पत्नीचा जीव

दरम्यान, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि मकरंद पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रमुख शिंदे यांच्या उडतरे गावात भाजपने ‘बेरजेचे राजकारण’ करत आपली घुसखोरी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. तसेच, ऋतुजा शिंदे आणि ऋषिकेश धायगुडे पाटील यांना सभापतीपदे देत भाजपने स्थानिक नेतृत्व तयार करण्यावर भर दिला आहे. ही पावले मकरंद पाटील यांना लक्ष्य करतच उचलली गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हे देखील वाचा : धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याने पेटला वाद

या सर्व घडामोडींमुळे वाई मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ही स्पर्धा उघड संघर्षात परिवर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाईतील राजकारण येत्या काळात अधिकच टोकदार आणि चुरशीचे होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Web Title: Intense politics in the wai assembly constituency rural development minister jaykumar gore aggressive strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
1

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
2

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
3

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
4

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.