'या' कारणांमुळे बाद होत आहेत लाडक्या बहिणींचे अर्ज; तुम्हीही निकष पूर्ण केलेत का? (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यंदा महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या 10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी विधीमंडळामध्ये विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये येत्या महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने खास गिफ्ट देण्याचे ठरवले आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधीमंडळामध्ये उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल माहिती दिली आहे. तसेच आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देखील मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना आदिती तटकरे म्हणाल्या, “येत्या आठ मार्च रोजी विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे. त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार. खास महिला लोकप्रतिनिधिंसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल. याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरीत केला जाणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे आणि सरकार आता ती योजना बंद करेल अथवा या योजनेचे निकष कठोर करून पात्र महिलांची संख्या कमी करेल, असे दावे केले जात होते. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की ही योजना बंद होणार नाही. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अपात्र महिलांवर योजनेतून बाद होण्याची टांगती तलवार आहे.