महागठबंधनने प्रसिद्ध केला जाहीरनामा (फोटो- ani)
बिहारमध्ये होणार विधानसभा निवडणूक
दोन टप्प्यात होणार मतदान
महागठबंधनने प्रसिद्ध केला जाहीरनामा
Bihar Elections 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांची घोषणा झाली आहे. तसेच आज महागठबंधनने आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारच्या जनतेसाठी काय काय घोषणा करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेऊयात.
महागठबंधनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याला संकल्प पत्र असे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळेस महागठबांधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. महागठबंधनने आधीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला आहे. या संकल्प पत्राला ‘तेजस्वी प्रण’ असे नाव देण्यात आले आहे.
ये इंडिया गठबंधन का संकल्प पत्र दलों और दिलों का प्रण है। एक-एक घोषणा दिल से लिया हुआ प्रण है, अपने हर प्रण को प्राण झोंक कर पूरा करेंगे। एक बिहारी दिल से जब कुछ ठान लेता है तो फिर बिना हासिल किए रुकता नहीं है। pic.twitter.com/wxQXH11tU9 — Tejashwi Yadav (@yadavtejashwi) October 28, 2025
महागठबंधनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी बिहारच्या जनतेला प्रत्येक परीवारातील सदस्याला नोकरी आणि 5 गुंठे जमीन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. युवकाना रोजगार, नोकरी असे आश्वासन पूर्ण करण्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.
तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मतभेदांमध्ये, महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडी जिंकल्यास तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी यांना मुख्यमंत्रीपदाचे आणि उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची घोषणा करताना अशोक गेहलोत म्हणाले, “सर्वांचे मत घेतल्यानंतर, आम्ही निर्णय घेतला आहे की तेजस्वी यादव हे या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील.” गेहलोत यांनी असेही सांगितले की मुकेश साहनी हे उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील.
अशोक गेहलोत म्हणाले, “देशाच्या सध्याच्या स्थितीबद्दल काळजी करणे महत्वाचे आहे. देश कुठे चालला आहे हे कोणालाही माहिती नाही. देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. या काळात देशाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी, कामगार, सामान्य लोक, विद्यार्थी आणि तरुणांसाठीही अशीच परिस्थिती आहे. जेव्हा हे घडते तेव्हा लोकांना बदल हवा असतो आणि यावेळी बदल घडेल. जनतेने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, ते संपूर्ण देशाने पाहिले.”






