
Supriya Sule Post For Ajit Pawar Rakshabandhan 2026
Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
प्रिय दादा,
आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही.
लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे! ❤️
Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जाणारे लियरजेट ४५ (Learjet 45) हे चार्टर विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. या अपघतात अजित पवार यांच्यासह दोन वैमानिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यां, अशा एकूण पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. खराब हवामान, कमी दृश्यमानता (लो व्हिजिबिलिटी) आणि दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले.
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या… pic.twitter.com/rlyUMuslMt — Supriya Sule (@supriya_sule) August 28, 2026