मी पुढचा दौरा रद्द करू शकतो... पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटलांचे सूचक विधान
या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीचा उल्लेख करत पुढील दौऱ्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. “उपोषणात दौरा करणे सोपे नाही. शारीरिक त्रास प्रचंड वाढत आहे. त्यामुळे मी पुढचा दौरा रद्द करू शकतो. दौरा महत्त्वाचा नाही, आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून थेट मुंबईला जाईन” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर
आपल्या प्रकृतीपेक्षा आरक्षण महत्त्वाच आहे. दौरा महत्त्वाचा नाही. माझ्याकडून आता पुढचा दौरा शक्य होत नाही. प्रकृती सुधारली तर पुढील दौऱ्यात सहभागी होऊ, मात्र त्रास कायम राहिला तर प्रवास करणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सततचे उपोषण, प्रवास आणि त्यातून होणारा शारीरिक थकवा यामुळे दौरा थांबवून थेट मुंबईच्या दिशेने जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुढील दिवसांत आपला दौरा सुरू ठेवतात की तो रद्द करून थेट मुंबईकडे रवाना होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, पाटोदा येथे जरांगे पाटील यांचा ताफा रात्री उशिरा दाखल झाला. एवढ्या उशिराची वेळ असूनही हजारो मराठा समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी आपल्या पुढील प्रवासाबाबत हे महत्त्वाचे संकेत दिले.
राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका
पाटोद्यातील सभेत जरांगे पाटील म्हणले की, पुढच्या प्रवासात आपल्या मागे मोठ्या संख्येने वाहने घेऊन येऊ नका, उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे नको, माझ्या मागे आलात तर मी पुन्हा अंतरवाली सराटीत जाईन. नाहीतर पाटोद्यातच उपोषण सुरू करेल,” असा इशारा त्यांनी दिला.
५८ लाख नोंदी मिळाल्या आहेत. या नोंदींच्या आधारे मोठ्या संख्येने समाज आरक्षणाच्या प्रक्रियेत जातील. आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू आहेत. पेनड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. सरकारने काहीही म्हटलं तरी नोंदी आपल्या हातात आहेत. आता आपल्याकडे चेक आहे. आपण तो कधीही बँकेत टाकू शकतो. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत,” असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं.






