मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा सरकारचा कट? उपोषणाआधी मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप
धक्कादायक बाब म्हणजे जरांगे पाटलांनी या आंदोलनासंदर्भात गंभीर आरोपही केला आहे. “मराठा समाजाच्या आंदोलनात लोकांना घुसवून दंगल घडवण्याचा कट होता. असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने देवदेवतांच्या आडून वार केला. आता आपणही डाव टाकायचं मराठ्यांनो, मी तुम्हाला योग्य वेली मुंबईत बोलवेन, १५ तारखेला मी एकटाच जातो. सोबत फक्त दोन गाड्या आणि १० लोक असतील, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार;
मी आता निघतो, कसे अडवतात, ते बघूच. कोण आझाद मैदानात परवानगी देत नाही तेच बघतो, मराठ्यांची गर्दी होणार म्हणून त्यांनी परवानगी नाकारली. आता मी एकटाच जातो. उद्या सकाळी आंतरवाली सराटीतून मुंबईला जायला निघणार आहे, इतरांनी येऊ नका, फक्त गाड्या तयार ठेवा, योग्य वेळी मी तुम्हाला बोलावेन, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मी ज्या मार्गाने जायचं ठरवलं होत त्याच मार्गाने जाणार, जिथं मुक्काम ठरला होता, तिथे मुक्काम करणार, त्यात फक्त जेवणासाठी जे साहित्य आणलय ते तयार केलं तर ते वाया जाणार नाही, तुम्ही सध्या काही करू नका, ते नंतर कामाला येईल, ज्या ठिकाणी मुक्काम ठरलेत तिथेच मुक्काम होतील, फक्त लाखो लोकांसाठी होणारा खर्च वाचला, आता मी एकटा जाणार आहे. पैसे वाया घालवायचे नाही, वाचलेले पैसे आणि साहित्य मुंबईत समाजाच्या कामाला येतील, असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस असून त्यांनी सलाईन आणि पाणीदेखील बंद केलं आहे. त्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली आहे. सध्या सलाईनच्या जिवावर जगतोय, तुमच्याशी बोलतोय, कधीही काहीही होऊ शकतं, त्रास जाणवू लागला आहे, असही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.






