Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher Recruitment : अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रक्रियेची पूर्ण माहिती दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 28, 2025 | 05:58 PM
'संजय राऊतांना राजकीय कावीळ, औषध मी देतो'; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निशाणा

'संजय राऊतांना राजकीय कावीळ, औषध मी देतो'; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

याबाबत माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचे राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी २०टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहे. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य (aptitude) यांचे मुल्यमापन परिसंवाद (seminar) अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक (lecture in a classroom situation) अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृक-श्राव्य चित्रिकरण,बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात येईल.
मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील. नवीन निवडप्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरिता याच कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित अध्यपकांची निवड होईल. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

योगेश कदम यांच्यावरुन राजकारण रंगलं 

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकावर जाऊन पाहणी केली. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबतचर्चा करुन प्रकरणाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेत योगेश कदम यांनी पोलिसांची गस्त सुरु होती. स्वतः पीआय गस्त घालत असल्याचे देखील स्पष्ट केले. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस पूर्ण प्रयत्नांनी तपास करत आहेत. असे सांगितले. याचबरोबर पीडित मुलीने घटना होत असताना आरडाओरड केली नाही. यामुळे आरोपीला क्राईम करताना सोपे गेले. आरडाओरड केली असती तर आसपासच्या लोकांनी मदत केली असती. बसस्थानकावर 10 ते 12 लोक असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे योगेश कदम म्हणाले आहेत. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. खासदार राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

Web Title: Minister chandrakant patil informs that recruitment for teaching posts will be done

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • Pune University

संबंधित बातम्या

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’
1

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
2

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
3

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
4

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.