Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली भाषा आणि दिलेली धमकी यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 09:33 PM
पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! (Photo Credit- X)

पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा!
  • अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू
  • म्हणाले…
मुंबई: ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणारे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली भाषा आणि दिलेली धमकी यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, आता खासदार संजय दिना पाटील यांनी स्वतः समोर येत या संपूर्ण प्रकरणावर जाहीर माफी मागितली आहे.

संजय दिना पाटलांची दिलगिरी

वाढता वाद पाहता संजय दिना पाटील यांनी एक विशेष व्हिडिओ जारी करत पत्रकार बांधवांची मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार का घडला, याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या दिवसापासून मला सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवरून शिवीगाळ करून माझा अपमान केला जात आहे. मी तो अपमान सहन केला. आज सकाळी काही पत्रकार मित्र आले होते, तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, मला पक्षप्रवेशाबद्दल काहीही विचारू नका; मला जे बोलायचे होते ते बोलून झाले आहे.”

माझ्या आजच्या प्रतिक्रियेतून पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. pic.twitter.com/sxFRrcuvov — Sanjay Dina Patil (@SDPatil_16) June 25, 2026


ते पुढे म्हणाले, “शिवसेनेत जाण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता. पण माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नीला आणि दिवंगत वडिलांबद्दल खोट्या व वाईट गोष्टी पसरवल्या जात आहेत. पत्रकार याच मुद्द्यावर प्रश्न विचारत होते. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वाद वाढत गेला आणि माझ्या तोंडून चुकीचे अपशब्द निघाले.”

पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी

आपल्या कृत्याचा पश्चात्ताप व्यक्त करताना खासदार पाटील म्हणाले की, माझ्याकडून जे अपशब्द वापरले गेले, त्यासाठी मी त्या पत्रकार मित्रांची आणि संपूर्ण पत्रकार समूहाची जाहीर माफी मागतो. “तुम्ही माझ्या राजकीय निर्णयावर कितीही टीका करा, त्याला माझी हरकत नाही; परंतु कृपा करून माझ्या कुटुंबाला या वादापासून दूर ठेवा,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी शेवटी केली.

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

नेमका काय झाला होता वाद?

शिवसेना पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील आणि पत्रकारांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी त्यांच्याकडून पत्रकाराला थेट धमकावण्यात आले. “रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

पत्रकार दादा/ताई प्रश्न विचारतात तर त्याला हे संजय दीना पाटील “कशाला गां*** बोटं घालताय?” म्हणतात? संजय दीना पाटील सारखे माजोरडे लोकं पत्रकारांना शिव्या देतात, मारण्याची भाषा करतात. ही भाषा लोकप्रतिनिधीला शोभते का?#लोकशाहीचाचौथास्तंभ #सत्तेचामाज #माजोरडेलोकप्रतिनिधी… pic.twitter.com/SCRyaK8O0Q — Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 25, 2026

संजय राऊत कडाडले

पत्रकारांना दिलेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी आणि गृहमंत्रालयाने कोणताही राजकीय पक्षपात न करता कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. कॅमेऱ्यासमोर हत्या आणि स्मशानाची भाषा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत, मात्र एखादा लोकप्रतिनिधी त्यांना जुमानत नसेल तर त्याला कायद्याची जाणीव करून द्यावी, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थितीची तुलना बिहारशी करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“गद्दारांना गद्दारच म्हणणार”

स्वतः शिवीगाळ केल्याच्या आरोपांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, एखाद्याला राजकीय टीका करणे आणि थेट जीवे मारण्याची धमकी देणे यात मोठा फरक आहे. गद्दारी करणाऱ्यांना गद्दार म्हणणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘सत्ता डोक्यात गेली का?’ पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल

Web Title: Mp sanjay dina patil who threatened journalists issues an apology finally releases a video to clarify his stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Sanjay Dina Patil
  • shivsena

संबंधित बातम्या

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा
1

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
2

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
3

‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

Shiv Sena Conflict:  सेनेच्या लढाईवर काय म्हणाल्या ज्योती वाघमारे ? पहा Exclusive मुलाखत
4

Shiv Sena Conflict: सेनेच्या लढाईवर काय म्हणाल्या ज्योती वाघमारे ? पहा Exclusive मुलाखत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.