(Photo - X)
Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे पाटील यांनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे. जरांगे पाटलांना मॅनेज करण्यासाठी एकनाथ शिंदेनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमधून करण्यात येत आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊतांनी भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली. “या नाट्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे हि तीन महत्त्वाची पात्रं आहेत, बाकी सगळे एक्स्ट्रा आहेत,” असे म्हणत त्यांनी भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांच्या आरोप – प्रत्यारोप नाट्यावर निशाणा साधला.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचा उल्लेख करत राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर निशाणा साधला. ‘या नाट्यात तीन महत्त्वाची पात्रं आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे. बाकी सगळे एक्स्ट्रा आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
या प्रकरणात विशेष तपास पथकाची (SIT) चौकशी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. आधी गुन्हा दाखल करून त्यानंतर SIT स्थापन का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.
‘पाचशे कोटी ही काही लहान रक्कम नाही. या प्रकरणाची नीट चौकशी होईल का?’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तपासाच्या निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली.
राऊत यांनी या संभाषणामागे भाजपच्या कोअर टीममधील व्यक्ती असल्याचा दावा केला. तसेच भाजपच्या एका विधान परिषद आमदाराचा संदर्भ देत त्यांनी नाव न घेता टीका केली. माझ्या माहितीनुसार हे भाजपच्या विधान परिषदेच्या आमदाराने केलंय. तुम्ही त्याचे फार लाड केले ते अंगलट आलंय आता… केंद्रातील सरकार पडणार याची खात्री पटतेय आता..”
“टेप कुणी फोडली? भाजपचे अंतर्गत संभाषण रेकॅार्ड होतं म्हणजे गृहखातं तुमच्या विरोधात गेलय.. आमचे फोन टॅप करायचे आता तुमचेच लोक तुमचेच फोन टॅप करतायत,”’ असं म्हणत राऊत यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला.
या प्रकरणामुळे भाजप आणि शिंदे गटातील संबंधांबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणात पुढे कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ans: संजय राऊत यांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचा उल्लेख करत राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर टीका केली. त्यांनी SIT चौकशीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले.
Ans: राऊत यांनी आधी गुन्हा दाखल करून नंतर SIT स्थापन का करण्यात आली नाही, असा सवाल केला. तपासाच्या निष्पक्षतेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.






