
Mumbai Woman Confronts Minister girish mahajan Over Rally Traffic Jam opposite leader Appreciate
वरळी डोममधील मंत्री गिरीश महाजन यांना खडसावणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वांनी महिलेचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावर त्या महिलेच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. विरोधकांनी देखील यामुळे भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करुन लिहिले की, “नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही नारी_शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी_शक्ती पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsss फाडतील..! अशी टीका रोहित पवारांनी केली.
नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही #नारी_शक्ती खऱ्या अर्थाने #वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो… pic.twitter.com/qDCAbhzRc3 — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 22, 2026
हे देखील वाचा : “भाड्याची माणसं आणून रस्ते जाम…हा जगातील निर्लज्जपणा: MP संजय राऊतांचे टीकास्त्र
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिले आहे की, अरे राम!नारीशक्तीला सलाम! मोदीजींनी अगदी बरोबर म्हटले होते “महिला माफ करणार नाहीत”, असा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन देखील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भाजपचे राजकारण महिलांच्या नावावर आणि त्यासाठी वेठीस सामान्य महिला… आज वरळी येथे भाजपाच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या संतप्त स्थानिक महिलेने थेट भाजप नेत्यांना जाब विचारला! असे शिवसेनेने लिहिले आहे.
नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही #नारी_शक्ती खऱ्या अर्थाने #वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो… pic.twitter.com/qDCAbhzRc3 — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 22, 2026
हे देखील वाचा : ‘काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या’; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान
याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसकडून देखील भाजपचा खरपूस समाचार घेण्यात आला. सोशल मीडियावर लिहिले आहे की, “भाजप महायुतीच्या फेक नरेटीव मोर्चात ट्रॅफिक जाममुळे किती गाड्या अडकल्या आहेत बघा. लोकांना वेठीस धरणे हेच या सत्ताधाऱ्यांची हौस झाली आहे.भाजपला त्यांची ही नौटंकी करायची एवढीच हौस होती तर त्यांनी ती राजभवन, वर्षा बंगला, मंत्रालय आणि मंत्र्यांच्या घराबाहेर करायची होती. भाजपच्या फेक नरेटीव स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांना का त्रास देण्यात आला?” असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.