Rahul Gandhi convoy Accident: पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर, दोघे जखमी
पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्याचा अपघात झाला. सुलतानपूरच्या हालियापूर परिसरात ८९.५ मैलखुणाजवळ राहुल गांधींच्या ताफ्यामागे प्रवास करणाऱ्या चार गाड्या आणि एका रुग्णवाहिकेची टक्कर झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, या अपघातात राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित आहेत. राहुल गांधी यांच्यावरील मानहानीच्या खटल्यावर आज निर्णय दिला जाईल. राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यासाठी पूर्वांचल द्रुतगती मार्गे सुलतानपूरला जात आहेत. यापूर्वी ते लखनौ विमानतळावर पोहोचले, जिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात
सोमवारी सुलतानपूरच्या दिशेने जात असताना पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील अनेक वाहनांची टक्कर झाली. राहुल गांधी २०१८ च्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात सुलतानपूर येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात हजर होण्यासाठी जात होते. अपघातानंतर गांधी न्यायालयात पोहोचल्याची पुष्टी एका काँग्रेस कार्यकर्त्याने केली आहे.
या घटनेच्या व्हिडिओमध्ये द्रुतगती मार्गावर अनेक वाहने एकमेकांवर आदळताना दिसत आहेत, तसेच एका रुग्णवाहिकेला इतर वाहनांनी मागून धडक दिली आहे. ही रुग्णवाहिका गांधींच्या ताफ्याचा भाग होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक वृत्तानुसार, एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या वाहनाची रुग्णवाहिकेला धडक बसली. ही टक्कर झाली तेव्हा राहुल गांधींचे वाहन आधीच खूप पुढे निघून गेले होते सुरक्षेसाठी पोलीस पथकासोबत असलेला हा ताफा, राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सकाळी ११.१५ च्या सुमारास सुलतानपूर न्यायालयात पोहोचणे अपेक्षित होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. हा खटला २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बेंगळुरू येथील एका रॅलीत राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांशी संबंधित आहे.






