Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

दौंड तालुक्यात भाजपाचा आमदार असताना राष्ट्रवादीने सात पैकी सहा जागांवर विजय मिळविला. जिल्हा परिषद सभागृहात अनुभवी सदस्यांसह मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी प्रवेश केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 05, 2026 | 01:12 PM
ZP President, Daund News, NCP Politics, Maharashtra Politics,

ZP President, Daund News, NCP Politics, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा गजर करीत निर्विवाद वर्चस्व
  • पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांना थेट अध्यक्ष व सभापतीपदाची संधी
  • जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वारसदार स्पर्धेत
संदीप पाटील Pune Politics: पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. मिनी मंत्रालयाच्या चाव्या अनुभवी की तरुण सदस्याकडे द्यायच्या यावर पक्षात खल सुरू आहे. स्पष्ट बहुमत असलेल्या राष्ट्रवादीकडे तगडे दावेदार असल्याने कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Pune Zilla parishad)

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा गजर करीत निर्विवाद वर्चस्व राखले. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. उमेदवार निवडीपासून विजयाची रणनीती ठरविण्यापर्यंत महत्त्वाचे टप्पे अजित पवार यांनी लिलया पेलले. मात्र अखेरच्या टप्प्यात निवडणुकीवर दु:खाचे सावट राहिले. राष्ट्रवादीने प्रचार न करताही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. हा अजित पवार यांचाच करिष्मा होता. जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देत एकप्रकारे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. थोडक्यात दादा असताना आणि दादा नसतानाही जिल्हा परिषदेवर त्यांचीच छाप राहिली. ज्या तालुक्यातून सर्वाधिक सदस्य निवडून येतील त्या तालुक्याला अध्यक्षपद या त्यांच्या एका वाक्याने जिल्ह्याची राष्ट्रवादी कामाला लागली. त्याची निकालात प्रचिती आली. ७३ पैकी ५१ जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारत आपला वरचष्मा कायम राखला. इंदापूर, बारामती, मावळ, राजगड तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व जागा निवडून आल्या.

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब होणार

दौंड तालुक्यात भाजपाचा आमदार असताना राष्ट्रवादीने सात पैकी सहा जागांवर विजय मिळविला. जिल्हा परिषद सभागृहात अनुभवी सदस्यांसह मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी प्रवेश केला आहे. अध्यक्षपदासाठी पक्षात रस्सीखेच निर्माण झाली आहे. सत्तावाटपाचे सूत्र ठरविताना अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा मेळ घातला जाऊ शकतो. इच्छुक सदस्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र ऐनवेळी अजित पवार यांच्या धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वीरधवल जगदाळे यांना संधी मिळणार ?

यापूर्वी पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांना थेट अध्यक्ष व सभापतीपदाची संधी मिळाली आहे. पक्षाकडून कोणत्या निकषावर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते, याची पक्षाच्या गोटात उत्सुकता आहे. वीरधवल जगदाळे सलत तीन वेळा निवडून आले आहेत. अनुभवी सदस्य म्हणून त्यांची दावेदारी बळकट मानली जाते. अध्यक्षपदावर संधी न मिळालेल्या सदस्याला सभापतीपदाची संधी देऊन सत्तेचा समतोल साधला जाऊ शकतो. (Ajit Pawar NCP)

वळसे पाटील, इंगवले, खुटवड शर्यतीत

अध्यक्षपदासाठी अनुभवी सदस्याचा निकष लावल्यास दौंड तालुक्यातून अजित पवार यांचे विश्वासू सहकारी वीरधवळ जगदाळे, आंबेगाव तालुक्यातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील, शिरूर तालुक्यातून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, मुळशी तालुक्यातून शांताराम इंगवले, भोर तालुक्यातून माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड, बारामतीतून पंचायत समिती माजी सभापती करण खलाटे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वारसदार स्पर्धेत

तरुण सदस्यांचा विचार झाल्यास इंदापूर तालुक्यातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे पुत्र यशराज जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनिता बुट्टे पाटील, दौंडमधून माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात, पुरंदरमधून जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची कन्या प्राजक्ता दुर्गाडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

सुनेत्रा पवार यांचे कसब पणाला लागणार (sunetra pawar.jpg)

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन रणनीती आखायचे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीतून त्यांचा मुत्सद्दीपणा दिसून यायचा. त्यांनी निवड केलेल्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. पवार यांनी आपल्या कुशल संघटन कौशल्यातून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली. त्यांच्या पश्चात पदाधिकारी निवड करताना पत्नी सुनेत्रा पवार यांचे कसब पणाला लागणार आहे. त्या अजित पवार यांच्या रणनीतीचा अवलंब करणार का? हे पहावे लागेल.

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी अजित पवार गट ५१

भाजपा १०

शिवसेना ठाकरे गट ०६

शिवसेना शिंदे गट ०५

राष्ट्रवादी शरद पवार ०१

एकुण ७३

Web Title: Ncp tussle for pune zilla parishad president post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:30 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.