Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilesh Rane : बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असलेल्या निलेश राणे यांनी भाजपचे भांडाफोड करणारे स्टिंग ऑपरेशन केले. थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकत पैशांची बॅग जप्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 27, 2025 | 03:48 PM
Nilesh Rane sting operation at BJP Vijay Kinjavdekar house recovered 25 lakh cash Malvan News

Nilesh Rane sting operation at BJP Vijay Kinjavdekar house recovered 25 lakh cash Malvan News

Follow Us
Close
Follow Us:
  • शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांचे स्टिंग ऑपरेशन
  • भाजप कार्यकर्त्याच्या घरी टाकली धाड
  • विजय किंजवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये सापडले
Nilesh Rane money bag : मालवण : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. अनेक मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहेत. मात्र प्रचारामध्ये नेते एकमेकांची उणीधुणी काढताना दिसत आहे. एकीकडे शिंदे गटाचे नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत असल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असलेल्या निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजपचे भांडाफोड करणारे स्टिंग ऑपरेशन केले. थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकत पैशांची बॅग जप्त केली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मालवणमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी अचानक धाड टाकली. त्यांनी दारं बंद करुन घेत या भाजप कार्यकर्त्याला कोंडीत पकडले. या भाजप कार्यकर्त्याच्या घरी चक्क पैशांचं गबाड सापडलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर येत आहेत.

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली आहे. आमदार निलेश राणे यांनी किंजवडेकर यांच्या घराची सर्व दारे लावून घेतली. आणि स्टिंग ऑपरेशन करत पैसे बाहेर काढले. यामुळे मालवणच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात

विजय किंजवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. या पैशांचा निवडणुकीत गैरवापर होणार होता, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे, असं निलेश राणे म्हणाले. सदर घटनेनंतर निलेश राणेंनी निवडणूक विभागाच्या पथकाला आणि मालवण पोलिसांना पाचारण करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा पैशांवर कारवाई होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

काय म्हणाले आमदार निलेश राणे?

आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणे म्हणाले की, रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे. निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते, कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते, भारतीय जनता पार्टीचे मालवण येथे रणजीत देसाई मोहन सावंत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर मुंबईमधून कित्येक लोक पैसे वाटण्यासाठी खास येथे आलेले आहेत, यावर निवडणूक आयोग काय शासन करणार त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असे स्पष्ट मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Nilesh rane sting operation at bjp vijay kinjavdekar house recovered 25 lakh cash malvan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Malvan News
  • nilesh rane
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर
1

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर

पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत ‘हाय व्होल्टेज’; भावकीचे राजकारण सुरू
2

पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत ‘हाय व्होल्टेज’; भावकीचे राजकारण सुरू

‘महाराष्ट्रातील जनता निराश, राज्य सध्या चुकीच्या दिशेला चाललंय’; सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका
3

‘महाराष्ट्रातील जनता निराश, राज्य सध्या चुकीच्या दिशेला चाललंय’; सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ‘या’ बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी
4

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ‘या’ बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.