Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger 4: ठाकरे गटात भुकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा

Operation Tiger 4: कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार मुरजी पटेल यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला. मुरजी पटेल म्हणाले की,  “येत्या काही दिवसांत राज्यात ‘ऑपरेशन टायगर-४’ पाहायला मिळेल. 

  • By anuradha sagar
Updated On: Sep 07, 2026 | 12:10 PM
Operation Tiger 4, Murji Patel, Eknath Shinde,

Operation Tiger 4, Murji Patel, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटातील १४ आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार
  • ‘ऑपरेशन टायगर-४’ अंतर्गत हा मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे वक्तव्य
  • अंधेरी पूर्व येथील ‘आवाज शिवसेनेचा, जल्लोष स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमात केला गौप्यस्फोट
Operation Tiger-4: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात आधीच पक्ष आणि चिन्हावरून न्यायालयीन खटला आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. हा खटला सुरू असतानाच आता ठाकरे गट पुन्हा फूट पडणार असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी ऑपरेशन टायगर बाबत वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.

ठाकरेंचे १४ आमदार आणि काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या सहा आमदारांनी शिंदेंसोबत हातमिळवणी करत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा काही आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Weather Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक भागांत यलो अलर्ट

महिला सक्षमीकरणासोबतच महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने अंधेरी पूर्व परिसरात आमदार मुरजी पटेल यांच्या वतीने ‘आवाज शिवसेनेचा, जल्लोष स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी ग्रुप डान्स, पाककला आणि मंगळागौरीच्या विविध स्पर्धांचे आयोजित करण्यात आल्या होत्या. शेकडो महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना मोठ्या प्रमाणावर पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो

‘येत्या काही दिवसांत ऑपरेशन टायगर-४

दरम्यान, कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार मुरजी पटेल यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला. मुरजी पटेल म्हणाले की,  “येत्या काही दिवसांत राज्यात ‘ऑपरेशन टायगर-४’ पाहायला मिळेल.

शिवसेना ठाकरे गटाचे १४ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.   हे आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील.  केवळ आमदारच नव्हे, तर ठाकरेंचे नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. आधी आमदारांचा आणि त्यानंतर नगरसेवकांचाही अधिकृत पक्षप्रवेश होईल,” असे त्यांनी सांगितले.

मुरजी पटेल यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात शिवसेनेतील अंतर्गत राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या दाव्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि प्रत्यक्षात कोणते राजकीय बदल घडतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Operation tiger 4 murji patel claims 14 thackeray mlas to join shinde sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.