Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोडाफोडीच्या राजकारणातून लोकशाही धोक्यात! मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात; ठाकरे गटातील घडामोडींवरून टीका

Prithviraj Chavan: फोडाफोडीच्या चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी, केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घडवून आणला जात असल्याचा आरोप केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 08:53 PM
मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात (Photo Credit- X)

मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • फोडाफोडीच्या राजकारणातून लोकशाही धोक्यात
  • मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात
  • ठाकरे गटातील घडामोडींवरून टीका
कराड : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संभाव्य फूट, केंद्र सरकारचे राजकारण आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कराड येथे जोरदार टीका केली. लोकसभा सदस्यांची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नांसाठी केंद्र सरकारला (Central Goverment) दोन तृतीयांश बहुमताची गरज असून, त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याच्या वृत्ताचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले, या घडामोडींचे अद्याप खंडन झालेले नाही. केंद्र सरकारला उत्तर भारतातील राज्यांचे राजकीय वजन वाढविण्यासाठी लोकसभेची पुनर्रचना करायची असून, त्यासाठी आवश्यक बहुमत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील फोडाफोडी वाढल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप निवडणुका प्रामाणिकपणे जिंकू शकत नसल्याचा आरोप करत त्यांनी दुबार मतदान, बोगस मतदान आणि ईव्हीएम संदर्भातील शंका उपस्थित केल्या. लोकसभेत मोठे बहुमत मिळवून देशातील राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू असून, देशात एका व्यक्तीकेंद्रित सत्ताकारणाची प्रवृत्ती वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फोडाफोडीच्या चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर चव्हाण यांनी, केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घडवून आणला जात असल्याचा आरोप केला. सध्याचे सरकार भ्रष्टाचाराने ग्रासलेले असून, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची आहे. महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या फुटींना केंद्रातील मोदींचा राजाश्रय असल्याचा आरोप करत त्यांनी रोजगार, शेती आणि महागाई या प्रश्नांवर केंद्र सरकारने लोकांची फसवणूक केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी, देशाची अर्थव्यवस्था, रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि परराष्ट्र धोरणातील प्रश्न उपस्थित करत केवळ परदेश दौरे करून विकास होत नसल्याची टीका त्यांनी केली.

‘लग्न एकासोबत करायचं अन् पळून दुसऱ्यासोबत…’, फोडाफोडीच्या राजकारणावर रोहित पवार कडाडले; थेट सांगितला खासदारांचा ‘रेट’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचे भाजपला आदेश आहेत. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होत आहे. देशातील लोकशाही कमकुवत होत असून, भ्रष्टाचारातून मिळणारा पैसा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने निर्माण झालेल्या चिंतेबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. काही ग्रामपंचायतींनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असा इशारा दिला असल्याचा उल्लेख करत त्यांनी नदीत रासायनिक पदार्थ मिसळल्याच्या चर्चा असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती देणार आहे. संबंधित केमिकल कोणत्या कारखाना, उद्योग किंवा अन्य कोणत्या कारणाने नदीत आले, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray MLA: ६ खासदार गेले, आता १६ आमदारांची बारी? एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटात पुन्हा ‘धकधक’

Web Title: Prithviraj chavan launches a scathing attack on the modi government criticizes developments within the thackeray faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • BJP
  • central goverment
  • Karad
  • Maharashtra Politics
  • Prithviraj Chavan
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
2

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.