Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Congress on Caste Census : मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात जातनिहाय जनगणना, आरक्षण आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Oct 04, 2026 | 05:25 PM
Congress on Caste Census

Congress on Caste Census

Follow Us
Follow Us:
  • जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेसचा जोर
  • हर्षवर्धन सपकाळ यांची आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून मागणी
  • विजय वडेट्टीवारांकडून ओबीसी हक्क आणि मंडल आयोगाचा उल्लेख
 

मुंबई : जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली आहे. काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी जातनिहाय जनगणना, सामाजिक प्रतिनिधित्व आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आपली भूमिका स्पष्ट केली.  (Congress on Caste Census)

काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे करत प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला हवं, असं मत मांडलं. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सातत्याने पुढे आणला आणि त्यानंतर केंद्र सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला, असा दावा त्यांनी केला.

“लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे”

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी जातीव्यवस्थेमुळे समाजात विविध जातींमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं सांगितलं. ओबीसी समाजाला सामाजिक व्यवस्थेत दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोप करत या व्यवस्थेत बदल होण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!

प्रत्येक समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, याची माहिती समोर आल्यानंतर त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला हवं, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.

आरक्षणाच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर निशाणा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागण्यांवरून राज्य सरकारवर टीका केली. आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा वाढवणे आणि जातनिहाय जनगणना करणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात विविध समाजांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत. अशा परिस्थितीत मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण होत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.

विजय वडेट्टीवारांचा ओबीसी हक्कांवर भर

विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचा दावा करत त्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याचा उल्लेख केला.

मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्वासाठी महत्त्वाचं असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

“ओबीसी समाज फक्त मतदान करणारा नको”

ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे यांनी मंडल आयोगाचे माजी अध्यक्ष बी. पी. मंडल यांच्या योगदानाचा उल्लेख केला. मंडल आयोगाने आकडेवारीच्या आधारे ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस केल्याचं त्यांनी सांगितलं.

ओबीसी समाजाने केवळ मतदान करणारा घटक न राहता नेतृत्व करणारा समाज बनलं पाहिजे, अशी भूमिका भिंगे यांनी मांडली. यासाठी ‘हर एक ओबीसी, बनेगा काँग्रेसी’ हा संकल्प करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मंडल विरुद्ध मनुवाद’ हे पुस्तक सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना या विषयाची माहिती सहज समजावी, या उद्देशाने लिहिल्याचंही प्रा. भिंगे यांनी स्पष्ट केलं.

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

Web Title: Congress on caste census obc congress rahul gandhi mandal vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • BJP
  • Caste Census
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • OBC Reservation
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा
1

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
2

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड
3

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान
4

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.