Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप

एमपीएससी आणि एफडीएने या पेपर लीक प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करत रोहित पवार केली. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली जावी. सीआयडीच्या चौकशीबाबत आमचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2026 | 02:04 PM
Rohit Pawar, MPSC Scam, TET Scam, Maharashtra Politics,

Rohit Pawar, MPSC Scam, TET Scam, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
  • TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित असून तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार
  • तलाठी भरतीतील कथित गैरप्रकारांचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले होते
Rohit Pawar on Paper Leak Scam: नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरुन देशभरात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन झाले त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. या प्रकरणाचा वाद शांत होत नाही तोच महाराष्ट्रात पुन्हा एक पेपरफुटीचा घोटाळा समोर आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि टीईटी (TET) घोटाळ्यावरून राजकारण तापलं आहे. Rohit Pawar Links TET Scam Accused To BJP Leader; Claims WhatsApp Leak

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित असून तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो,” असा खळबळजनक आरोप रोहीत पवार यांनी केला आहे.

MPSC Paper Leak: टीईटी पेपरनंतर आता एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटली?

महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेतील पेपरलीकची काही प्रकरणे २०२६ मध्ये उघडकीस आली. यात NEET, TET,SRPF या परीक्षांचे पेपर लीक झाले. त्यानंतर आता एफडीए मधील औषध निरीक्षक परीक्षेचाही पेपर लीक झाल्याचा प्रकार समोर आले आहे. पेपरफुटीतून अधिकारी होणार असतील तर काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या औषधांनी जसा २२ मुलांचा मृत्यू झाला होता तशा घटना भविष्यात अशा अधिकाऱ्यामुळे घडू शकतात.” असा दावाही रोहित पवारांनी यावेळी केला.

रोहित पवार म्हणाले, हे प्रकरण कसं समोर आलं. तर नंदुरबारमधील कौटिल्य अॅकॅडमी क्लामधून हा पेपर लीक केला गेला. MPSCचा पेपर फुटला असं नाही पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटलान य ज्याने हा पेपर फोडला, त्या व्यक्तीने ज्यांना पेपर दिले त्यांना तो व्हाट्सअपवरून प्रश्नपत्रिका पाठवायचा आणि पाच मिनिटाच डिलीट करायचा. त्यातल्या एकाना त्याच्या मित्राला प्रश्नपत्रिका पाठवल्याने हेप्रकरण उघडकीस आले.

‘एका नायब तहसीलदारांच्या दोन्ही मुलांना अव्वल क्रमांक’

रोहित पवार म्हणाले, “एका नायब तहसीलदारांच्या मुलाला 13 वा आणि मुलीला 16 वा क्रमांक मिळाला आहे. हा केवळ योगायोग आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणात बार्शी कनेक्शन असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून विद्यार्थ्यांनी 21 जुलै रोजी एमपीएससीकडे तक्रार केली होती. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती नाही. उलट तक्रार करणाऱ्यांनाच पोलिसांकडून कारवाईची धमकी दिली जात आहे.”

एमपीएससी आणि एफडीएने या पेपर लीक प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करत रोहित पवार केली. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली जावी. सीआयडीच्या चौकशीबाबत आमचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे, असही रोहित पवार यांनी नमुद केलं.

MPSC Big Decision: विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC चा मोठा निर्णय; संगणकीय परीक्षेचा निर्णय स्थगित!

‘तलाठी भरतीत 62 गैरप्रकार उघड झाले’

तलाठी भरती प्रक्रियेचाही उल्लेख करत रोहित पवार म्हणाले, “तलाठी भरतीतील कथित गैरप्रकारांचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर विद्यार्थ्यांना न्यायासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) जावे लागले. न्यायाधिकरणाच्या निकालात तलाठी भरती प्रक्रियेत 62 गैरप्रकार समोर आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.”

‘टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे भाजपशी संबंध’

टीईटी पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख करत रोहित पवार यांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले. “2018 मध्ये प्रथम टीईटी पेपरफुटी झाली होती. अलीकडील प्रकरणातही प्रीतीश देशमुख, अभिषेक सावरीकर आणि सुशील खोडवेकर यांची नावे समोर आली आहेत. अभिषेक सावरीकर यांचे कोणाशी संबंध आहेत, त्यांना संरक्षण कोण देत आहे, हे तपासले पाहिजे. टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे भाजपशी संबंध असल्याचा आमचा आरोप आहे,” असे ते म्हणाले.

https://t.co/M6GQvBplZ5 — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2026

Web Title: Rohit pawar press conference mpsc fda drug inspector tet exam paper leak allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MPSC Exams
  • rohit pawar
  • TET Exam

संबंधित बातम्या

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
1

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी
2

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.