Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची ‘ही’ कारणे चर्चेत

Sachin Ahir News : ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. त्यांच्या या निर्णयामागे नेमकी कोणती राजकीय कारणे आहेत, पक्षांतर्गत घडामोडींचा किती प्रभाव आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होऊ शकतात....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 12:57 PM
सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची 'ही' कारणे चर्चेत

सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची 'ही' कारणे चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ?
  • राजकीय निर्णयामागची ‘ही’ कारणे चर्चेत
  • सचिन अहिरांच्या निर्णयामागे काय कारणे?
Sachin Ahir News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीच्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांनी प्रत्यक्षात शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात महत्त्वाची भूमिका बजवणारे सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला, विशेषतः मुंबईतील संघटनात्मक राजकारणात, मोठा धक्का मानला जात आहे.

विधान परिषदेत ठाकरे गटाचे एकूण सहा आमदार होते, मात्र आता सचिन अहिर शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात फक्त पाच आमदार उरले आहेत. दरम्यान या सगळ्यानंतर आता सचिन अहिर यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होणार की नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी धक्का! आमदार सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदाच्या शर्यतीत एन्ट्री

सचिन अहिरांच्या निर्णयामागे काय कारणे?

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सचिन अहिर पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत अस्वस्थ होते. विधान परिषदेतील जबाबदाऱ्या, आगामी राजकीय संधी आणि पक्षातील स्थान याबाबत त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी सत्ताधारी महायुतीकडून त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची तयारी सुरू होती.

उपसभापतीपदाची संधी ठरली निर्णायक

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सुरुवातीला नीलम गोऱ्हे आणि कृपाल तुमाने यांच्या नावांची चर्चा होती. मात्र ऐनवेळी महायुतीने सचिन अहिर यांना उमेदवारी दिली. ही संधी स्वीकारत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाल्याचे मानले जात आहे.

मुंबईतील ठाकरे गटाला मोठा फटका

सचिन अहिर हे मुंबईतील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. ते यापूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. आता त्यांच्या पक्षांतरामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीची भूमिका

सचिन अहिर यांच्या उमेदवारीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी, “सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार होते. आम्ही एका शिवसैनिकाला न्याय दिला आहे,” असे म्हणत त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच मंत्री उदय सामंत यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याचे स्पष्ट केले.

पुढे काय?

सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्याच्या राजकारणात त्याचे परिणाम दिसू शकतात. महायुतीने ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत विरोधी गटातील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याची रणनीती अधिक आक्रमक केल्याचेही या घडामोडीतून स्पष्ट होत आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?

Web Title: Sachin ahir why left uddhav thackeray shiv sena political reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sachin Ahir
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
4

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.