Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी धक्का! आमदार सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदाच्या शर्यतीत एन्ट्री

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर त्यांनी विधानसभेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला असून, या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 12:13 PM
ठाकरे गटाला आणखी धक्का! आमदार सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदाच्या शर्यतीत एन्ट्री

ठाकरे गटाला आणखी धक्का! आमदार सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदाच्या शर्यतीत एन्ट्री

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाला मोठा धक्का!
  • आमदार सचिन अहिरे शिंदे यांच्या शिवसेनेत
  • उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल
MLA Sachin Ahire News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर 3.0’ अंतर्गत ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मनीषा कायंदे आणि आमदार रविंद्र फाटक उपस्थित होते. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी काळात विधानसभेतील संख्याबळ आणि राजकीय समीकरणांवर या घडामोडीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटासाठी मात्र हा प्रवेश मोठे राजकीय बळ मानला जात असून, पक्षाने विधानसभा आणि संघटनात्मक स्तरावर आपली ताकद आणखी वाढवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी महायुतीकडून त्यांना किती व्यापक पाठिंबा मिळतो आणि विरोधकांची भूमिका काय राहते, यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून असेल.

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?

सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटासमोरील आव्हाने आणखी वाढली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला राजकीय ताकद मिळाल्याचे मानले जात असून, येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी शिंदे शिवसेनेचे नीलम गोऱ्हे आणि कृपाल तुमाने यांच्या नावांवर चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी महायुतीच्या वतीने उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सचिन अहिर यापूर्वी मुंबईतील वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते, तेव्हा सचिन अहिर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची ऑफर दिली होती. आता, त्यांचा महायुतीला दिलेला पाठिंबा हा मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “सचिन अहिर हे शिवसेनेचे नेते होते आणि आता ते आपल्याच पक्षात परतले आहेत. आम्ही उपसभापती पदासाठी एका शिवसैनिकाला न्याय दिला आहे. त्यांच्या मतदारसंघावर दुसऱ्या कोणीतरी अतिक्रमण केले होते,” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.

दरम्यान, मंत्री उदय सामंत म्हणाले की, सचिन अहिर यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया तपासून आणि पडताळणी करूनच विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Web Title: Sachin ahire joins eknath shinde shiv sena files nomination for deputy speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
2

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
4

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.