Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे. या सगळ्या प्रकरणावर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ जनक विधान केलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 03:04 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत
  • संजय राऊत यांनी खळबळ जनक विधान
  • अशोक खरात याच्या संपर्कात अनेक बडे नेते
Sanjay Raut On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणाची सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणात वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळी नावं समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अनेकांवर आता कायदेशिर कारवाई केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ जनक विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन

अशोक खरात याच्या संपर्कात अनेक बडे नेते

भोंदूगिरी, तंत्र-मंत्र आणि इतर गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक बडे नेते होते, अशी चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी थेट निशामा साधत म्हणाले की, “जर सरकार अशोक खरात यांच्या पाठीशी नसते, तर त्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी सरकारने जाहीर केली असती.” यावेळी ते पुढे म्हणाले की, “भोंदूबाबापेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी हे अधिक मोठे गुन्हेगार आहेत.” त्यामुळे या सर्व संबंधितांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहचला

अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच. सोबतच दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. सोबत खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, यांचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे. देशाचे बडे नेते अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहचला याची ही चौकशी व्हायला हवी अशी मागणी राऊतांनी केली आहे

खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि खरातची चौकशी यासगळ्यात बरेच गोष्टी समोर आल्या आहेत. यावेळी दिलेली उडवाउडवीची उत्तरे यावरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. “अशोक खरात हा मास्टरमाईंड असून तो पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देतो,” अशा शब्दांत सरकारी वकिलांनी खरातच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

NCP Politics : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

Web Title: Sanjay raut on ashok kharat serious allegations on deepak kesarkar maharashtra politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Politcs
  • rupali chakankar
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘राम मंदिरासाठी चांदीची वीट दिली याचा पुरावा काय?’; नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल
1

‘राम मंदिरासाठी चांदीची वीट दिली याचा पुरावा काय?’; नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
2

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत
3

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेली 4 किलो चांदीची वीट बेपत्ता? संजय राऊतांचा गंभीर सवाल
4

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेली 4 किलो चांदीची वीट बेपत्ता? संजय राऊतांचा गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.