Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: ‘चार तालुक्यांचे चार मंत्री… बाकी सातारा अधांतरी?’ सातऱ्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली

जिल्ह्यातील विकासनिधी वाटपावरूनही नाराजी वाढत आहे. प्रत्येक मंत्री स्वतःच्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे खेचून आणत असताना इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांना मात्र मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 07, 2026 | 12:01 PM
Satara Politics, Shambhuraj Desai, Mahayuti, Satara News Live, Zilla Parishad Election,

Satara Politics, Shambhuraj Desai, Mahayuti, Satara News Live, Zilla Parishad Election,

Follow Us
Follow Us:
  • महायुती सरकारमधील अंतर्गत सत्तासमीकरणांमुळे जिल्ह्यातील मंत्री स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिल्याची भावना
  • सत्तासंघर्ष आणि महायुतीतील अंतर्गत अविश्वासाचा थेट परिणाम साताऱ्याच्या राजकारणावर झाल्याचे चित्र
  • प्रत्येक मंत्री स्वतःच्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे खेचून आणत असताना इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांना मात्र मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत
अनिल कदम, Satara Politics: सातारा जिल्ह्यात सध्या एक नवा राजकीय चांगलाच चर्चेत आला आहे — “चार तालुक्यांचे चार मंत्री… बाकी तालुके अधांतरी!”कारणही तसेच आहे. राज्यातील महायुती सरकारमधील अंतर्गत सत्तासमीकरणांमुळे जिल्ह्यातील मंत्री स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई, वाईत मकरंद पाटील, सातारा-जावळीत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांची विकासकामे व राजकीय हालचाल ठळकपणे दिसत आहेत. पण दुसरीकडे कराड दक्षिण उत्तर , फलटण, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांमध्ये मात्र “आपलं कोण?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष आणि महायुतीतील अंतर्गत अविश्वासाचा थेट परिणाम साताऱ्याच्या राजकारणावर झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात संख्याबळ भारतीय जनता पक्षाचे अधिक असतानाही पालकमंत्रीपद भाजपच्या हाती न जाणे, ही बाब भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. भाजपचे चार, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार अशी सध्याची ताकद असताना जिल्ह्यावरील नियंत्रणासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली झाल्याचे बोलले जात आहे.

7/12 Uatara : ७/१२ उतारा बंद, आता मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’; शहरी भागातील रहिवाशांसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय

राजकीय वर्तुळात तर एक खळबळजनक कुजबुज ऐकायला मिळत आहे. “पालकमंत्रीपद द्या आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद घ्या” असा फॉर्म्युला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी काही नेत्यांकडून पुढे करण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित मध्यवर्ती ठरल्याचे मानले जाते.

सातारा जिल्हा बँकेवर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने सत्ता पुन्हा त्यांच्या हातात जाऊ शकते, या भीतीतून काही मंत्र्यांना ‘झुलवत’ ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील एक मंत्री मनाने भाजपच्या जवळ असल्याचेही बोलले जात असल्याने समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील विकासनिधी वाटपावरूनही नाराजी वाढत आहे. प्रत्येक मंत्री स्वतःच्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे खेचून आणत असताना इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांना मात्र मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर “मंत्री आपल्या तालुक्याचेच, जिल्ह्याचे नाहीत” अशी टीका उघडपणे होऊ लागली आहे.

Maharashtra Politics : मंत्रिमंडळातून वगळलेले सावंत, केसरकर अद्याप ‘नॉट रिचेबल’; पण सत्तारांनी घेतली ‘या’ मंत्र्याची भेट

कराड उत्तर आणि दक्षिणमधील राजकीय हालचाली, फलटणमधील राष्ट्रवादीची पकड, कोरेगावातील नाराजी आणि खंडाळ्यातील संघटनात्मक शून्यता यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठे उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः उदयनराजे भोसले,बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि रामराजे नाईक-निंबाळकर शशिकांत शिंदे यांची पुढील भूमिका काय राहणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महायुतीतील अंतर्गत स्पर्धा, पालकमंत्रीपदाचा तिढा, जिल्हा परिषद सत्तेतील अस्तिरता आणि आगामी निवडणुकांची चाहूल यामुळे साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. सध्या तरी जिल्ह्यात एकच चर्चा ऐकू येते — “मंत्री चार… पण जिल्हा मात्र विभागलेला!”

 

Web Title: Satara politics shambhuraj desai mahayuti satara news live zilla parishad election bjp vs ncp satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Satara News
  • Satara Politics
  • Shambhuraj Desai
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.