Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा, स्वतःचे कार्यकर्ते मोठे करा,’ शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा

Sharmila Thackeray यांनी भाजप आणि RSS वर जोरदार टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 15, 2026 | 03:30 PM
शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा

शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा

Follow Us
Follow Us:

आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे, ‘तुमचे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्यासाठी ठेवले आहेत का? दुसऱ्यांचे पक्ष कशाला फोडता?” असा खरमरीत सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपसह आरएसएसवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी यावर भाष्य केले.

भाजपकडून इतरांचे पक्ष का फोडले जातात? असा सवाल यावेळी शर्मिला ठाकरेंनी उपस्थित केला. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार, 14 जून) घेतलेल्या खासदारांच्या बैठकीवरून बोलताना त्या म्हणाल्या, “ठाकरे गटातील काहीजण कालच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पाच – सहा जण नव्हते, म्हणजे ते गेले असे नाही. बैठकीला हजार असलेले लोक जाणारच नाहीत, असाही मानायचं कारण नाही. मला याचा चांगला अनुभव आहे. माझ्या पक्षातील काही लोक जातील, असं वाटल्यावर मी त्यांना फोन करायचे. तेव्हा ‘आम्ही इकडेच आहोत‘ असं ते म्हणायचे. दुसऱ्या क्षणाला ते चॅनेलवर दुसऱ्या पक्षात जाताना दिसायचे” असे त्या यावेळी म्हणाल्या.

कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल होणार? रोहित पवारांच्या आंदोलनादरम्यान सरकारकडून मोठे संकेत

त्या पुढे म्हणाल्या, “भाजपला इतरांचे पक्ष फोडणे, एवढंच काम करायचे आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा तुमची मुलं मोठीं कराना … 12 वर्ष सत्तेत आहात ना, तर किमान स्वतःचे कार्यकर्ते तरी मोठे करा. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप मध्ये चांगली मुलं आहेत, होती. त्यांनी दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का? त्यांनी तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला. इकडे उद्धवचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. आम्ही पक्षातून बाहेर पडलो आणि नवीन कार्यकर्ते तयार केले,” असे त्या यावेळी म्हणाल्या.

‘तृणमूल’ मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?

Web Title: Sharmila thackeray slams bjp and rss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • BJP
  • RSS

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
1

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
2

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
3

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
4

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.