Maharashtra Local Body Election Result 2025 : कळमनुरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा; आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी
हिंगोली : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतीत झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आज (दि.21) जाहीर केले जात आहेत. याचदरम्यान मोठी बातमी समोर येत असून, भाजपने मतमोजणीपूर्वीच तीन जागा जिंकल्या आहेत. मतमोजणीपूर्वी भाजपने धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवडे आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर या दोन नगर परिषद जागांवर बिनविरोध विजय मिळवला. तर हिंगोलीच्या कळमनुरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी झाल्या आहेत.
भाजपने सोलापूर जिल्ह्यातील उंगार नगरपंचायतीची जागाही बिनविरोध जिंकली असल्याची माहिती मिळत आहे. कळमनुरी नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी झाल्या आहेत. कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांची रणनिती यशस्वी ठरल्याचे पाहिला मिळाले. बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूरमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहिला मिळत आहे. महाराष्ट्रातील ही नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची मानली जाते. ही निवडणूक सत्ताधारी युती आणि विरोधी पक्ष दोघांनाही जनतेच्या पाठिंब्याचे सूचक मानली जाते.
विशेषतः बारामती आणि अंबरनाथ मतदारसंघांच्या निकालांवर सर्वांचे लक्ष आहे. बारामती ही पारंपारिकपणे राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा राहिली आहे, परंतु अंबरनाथमधील शहरी मतदारांची टक्केवारी महत्त्वाची भूमिका बजावेल. राजकीय पक्ष या महापालिका निवडणुकीच्या निकालांकडे, विशेषतः पुणे जिल्ह्यातील बारामती नगरपरिषद आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या निकालांकडे उत्सुकतेने पाहत आहेत. काही भागातील निवडणुका कोणत्याही लढतीशिवाय पार पडल्या आहेत. त्यामुळे आता याकडेही लक्ष लागले आहे.






