राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विदर्भ दौरा करत माध्यमांशी संवाद साधला (फोटो सौजन्य - एक्स)
Rupali Chakankar News : नागपूर : राज्यामधील महिला अत्याचाराच्या घटनांवर ताबा आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. लैंगिक अत्याचार रोखणे, बालविवाह रोखणे आणि हुंडाबळी रोखणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील बैठका आणि आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नागपूर, नांदेड आणि गोंदियामध्ये सभा घेत रुपाली चाकणकर यांनी महिला सुरक्षा आणि जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्य महिला आयोग राज्यातील सगळ्या भागात तक्रार निवारण करत आहे. नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे. या ठिकाणी आमच्याकडे फार तक्रारी आलेल्या नाहीत. महाराष्ट्र देशात घटस्फोटाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ही आपल्यासाठी दुःखद गोष्ट आहे. त्यामधील कारण शोधली पाहिजे. यामुळे कुटुंब उध्वस्त होतात, मुलांवर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे प्री मॅरेज कोन्सिलिंग आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे त्यासाठी आम्ही काम करतो, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वर्किंग महिला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कमिटी आहेत. मात्र त्या कागदावर राहत कामा नये म्हणून आम्ही आय सी कमिटी ऑडिट झालं पाहिजे हे सरकारला सांगितलं आणि सरकारने जीआर देखील काढला आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यापेक्षा ते एसआयटी कमिटीकडे व्हायला पाहिजे. शाळांमधील मुलीसंदर्भात सुद्धा काळजी आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी आवश्यक आहे. ऑनलाइन तक्रारी सुद्धा आहे. त्या संदर्भात जनजागृती आवश्यक आहे महिलांच्या संदर्भात अनेक तक्रारी आहे त्याच निवारण करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रुपाली चाकणकर यांनी घटस्फोटामुळे कुटुंबाचे होत असलेल्या नुकसानीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “कुटुंब वाचविणे आवश्यक आहे, त्यासाठी भरोसा सेल आहे. त्यांच्याकडे नागरिकांनी महिलांनी जावं तिथे कौन्सिलिंग केलं जाईल. हुंडाबळीच्या केसेस अनेक येतात, त्यासाठी समाजात लढा द्यावा लागेल, त्यासाठी महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे. एनसीआर्टीची आकडेवारी बघितली तर तक्रारी निवारण होत आहे. विरोधक टीका करत राहतात. बाल विवाह रोखण्यासाठी यंत्रणा आहे. त्याचा वापर करून हे थांबविले जाऊ शकते. प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर दहा ठिकाणी आहे. प्री मॅरेज कौन्सिलिंग झाल्याशिवाय मॅरेज हॉल बुक होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिला या कुटुंबासोबत राहतात त्यामुळे त्यांच्या तक्रारी नसतात कोणाच्या तक्रारी आल्यास कारवाई पोलिसांकडून केली जाऊ शकते,” असे देखील मत राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.