रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची 'ही' खास परंपरा बंद (Photo Credit- X)
रेल्वे बोर्डाच्या प्रधान कार्यकारी संचालक रेणू शर्मा यांनी यासंदर्भात एक औपचारिक पत्र प्रसिद्ध केले आहे. या आदेशानुसार, यापुढे निवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांना निरोप समारंभात सोन्याचा मुलामा दिलेली रौप्य पदके दिली जाणार नाहीत. मार्च २००६ पासून रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ २० ग्रॅम वजनाचे हे खास पदक देण्याची प्रथा सुरू केली होती, जी आता संपुष्टात आली आहे.
#BREAKING Indian Railways has discontinued its nearly 20-year-old practice of presenting gold-plated silver medals to retiring officials, following the fake silver coin scam. The Railway Board issued an official order halting the tradition with immediate effect. The decision… pic.twitter.com/pzdkLdnq2g — IANS (@ians_india) January 29, 2026
रेल्वेने अचानक हा निर्णय का घेतला, यामागे भोपाळ विभागात उघडकीस आलेला एक मोठा घोटाळा असल्याचे मानले जात आहे. एका अंतर्गत चौकशीत असे आढळले की, कर्मचाऱ्यांना दिलेली अनेक पदके बनावट होती. ज्या पदकांमध्ये चांदी असल्याचा दावा केला होता, त्यात चांदीचे प्रमाण केवळ ०.२३ टक्के इतके अत्यल्प निघाले. या फसवणुकीनंतर रेल्वेने संबंधित पुरवठादारावर एफआयआर (FIR) दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच ही पद्धत बंद करण्याचा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, रेल्वेकडे सध्या असलेला पदकांचा साठा आता निवृत्ती भेट म्हणून वापरला जाणार नाही. हा साठा इतर प्रशासकीय कामांसाठी किंवा पर्यायी कारणांसाठी वापरण्यात येईल.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, हा नवीन नियम ३१ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू होईल. म्हणजेच, फेब्रुवारी २०२६ पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती आता हे मानाचे पदक पडणार नाही.
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे हडपसरपर्यंतच धावणार; प्रवाशी संघटना आक्रमक






