Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली योजना! कर्जमाफीवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप

Rohit Pawar News: गेल्या तीन-वर्षांपासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीकडून अपेक्षा होती, परंतु या सरकारने ज्याप्रमाणे 2017 मध्ये अटी-शर्ती लागू करून कर्जमाफीचा आत्माच काढून घेतला होता

  • By anuradha sagar
Updated On: Jun 03, 2026 | 03:52 PM
Loan Waiver, Farmers News, Devendra Fadnavis, Rohit Pawar,

Loan Waiver, Farmers News, Devendra Fadnavis, Rohit Pawar,

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय
  • राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार
  • कर्जमाफी देण्यासाठी नियत लागते – रोहित पवार
Rohit Pawar tweet on farmer loan waiver: राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. या कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी आणि शर्तीसंदर्भात परिपत्रक काढणार आहे. पण या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

काय म्हटलं आहे रोहित पवारांनी ?

गेल्या तीन-वर्षांपासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीकडून अपेक्षा होती, परंतु या सरकारने ज्याप्रमाणे 2017 मध्ये अटी-शर्ती लागू करून कर्जमाफीचा आत्माच काढून घेतला होता तसाच प्रकार यंदा देखील केला आहे. सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगत असले तरी सरकारने 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफीची अट टाकली आहे.

विधान परिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी

2019 च्या कर्जमाफीचे लाभार्थी शेतकरी 32 लाखाहून अधिक असून त्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजाराचा लाभ मिळणार आहे. शिवाय 2019 मध्ये लाभ घेतलेल्या आणि ज्यांची थकबाकी 50 हजारपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना वरची रक्कम आधी भरवी लागेल तरच त्यांना 50 हजाराचा लाभ मिळणार आहे. राज्यात 50 हजारपेक्षा कमी पिककर्ज असलेले शेतकरी 2-3 % असतील, सरासरी पीक कर्ज 1 लाख रुपयाच्या घरात आहे. म्हणजे 1 लाखाचे थकीत कर्ज असेल तर आधी 50 हजार भरा मग उरलेले 50 हजार आम्ही देऊ अशी ही योजना आहे. त्यामुळे ही कर्जमाफी नाही तर कर्जवसुली योजना आहे.

कर्जमाफी देण्यासाठी नियत लागते, तशी नियत 2008 आणि 2019 मध्ये सरकारने दाखवून कुठल्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी केली होती. परंतु दुर्दैवाने आजच्या सरकारकडे नियत नाही म्हणूनच 2017 प्रमाणे अटी-शर्ती टाकल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत तत्काळ या अटी-शर्ती काढून महाराष्ट्राला अपेक्षित अशी कर्जमाफी करावी अन्यथा रस्त्यावर उतरून या सरकारला या अन्यायकारक अटी-शर्ती काढायला भाग पाडू…!

गेल्या तीन-वर्षापासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीकडून अपेक्षा होती, परंतु या सरकारने ज्याप्रमाणे 2017 मध्ये अटी-शर्ती लागू करून कर्जमाफीचा आत्माच काढून घेतला होता तसाच प्रकार यंदा देखील केला आहे. सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ… — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2026

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

आपल्या ट्विटमधून ते म्हणाले, “भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला, याचा निर्णय प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच होईल! लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला, पण आज जवळपास ८० लाख महिलांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच्या दाव्याकडेही शेतकरी संशयाने पाहत आहेत. या सरकारची पद्धतच घोषणा मोठी आणि लाभार्थी कमी अशी राहिली आहे. विविध अटी-शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे.”

 

Web Title: This is loan collection not a waiver mla rohit pawar criticized state govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers News
  • Maharashtra Govt
  • Maharashtra Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
1

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय
2

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!
3

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
4

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.