Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics : शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला

सातारा नगरपालिकेतील नगरसेवक निशांत पाटील आणि नगरसेविका मुक्ता लेवे यांच्याविरोधात दाखल अपात्रता अर्जांवरील सुनावणी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या समोर पार पडली. निवडणूक शपथपत्रात मालमत्ता व शैक्षणिक माहितीबाबत चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप असून, पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 01:51 PM
शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी १४ जुलैला

शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी १४ जुलैला

Follow Us
Follow Us:
  • शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत
  • अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला
  • शैक्षणिक माहितीबाबत चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप
सातारा : सातारा नगरपालिकेतील दोन नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता अर्जांवरील सुनावणी मंगळवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या समोर पार पडली. निवडणूक शपथपत्रात मालमत्ता व शैक्षणिक माहितीबाबत चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला असून, संबंधित बाजूंनी सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी मुदत मागितल्याने पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.

Sanjay Raut PC: ‘स्वाभिमान जागा झाला असेल तर मातोश्रीवर या’; अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर संजय राऊतांचे खुले आव्हान

नगरसेवक निशांत पाटील यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तक्रार दाखल केली असून, निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर नगरसेविका मुक्ता लेवे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी मालमत्ता आणि शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती सादर केल्याचा दावा केला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांना दिले आहेत. सुनावणीदरम्यान निशांत पाटील यांच्या वतीने ॲड. ताहीर मणेर आणि ॲड. सिद्धार्थ पाटील यांनी बाजू मांडली, तर तक्रारदार सुशांत मोरे स्वतः उपस्थित होते. मुक्ता लेवे यांच्या वतीने ॲड. उमेश शिर्के यांनी काम पाहिले. तक्रारदार अमित शिंदे हे ॲड. सागर निगडकर व ॲड. कमलेश ताटे यांच्यासह उपस्थित होते.

तक्रारदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळाव्यात तसेच त्यावर सविस्तर उत्तर देण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी संबंधित नगरसेवकांच्या वकिलांनी केली. त्यानुसार प्रांताधिकारी बारकुल यांनी दोन्ही बाजूंची मागणी ग्राह्य धरून पुढील सुनावणी १४ जुलै रोजी ठेवण्याचा निर्णय दिला. सुनावणीदरम्यान सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. संवेदनशील स्वरूपाच्या या प्रकरणामुळे प्रांत कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

प्रकरणाचे मूळ: नगरसेवकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Affidavit) नमूद केलेल्या माहितीत तफावत आढळल्याने किंवा खोटी माहिती दिल्यामुळे तक्रार दाखल झाली आहे.
पुढील सुनावणी: १४ जुलै रोजी संबंधित सक्षम प्राधिकारी किंवा न्यायालयासमोर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: Two corporators in trouble over affidavit information disqualification case hearing on 14th july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Politics
  • Satara

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
1

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
2

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
3

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
4

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.