Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! 6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ? संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला रवाना

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी 6 खासदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 16, 2026 | 09:42 PM
6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?

6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासदारांपैकी दोन खासदार आधीच दिल्लीत पोहोचले असून आणखी चार खासदार आज रात्री दिल्लीत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच हि फुटी रोखण्यासाठी खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी दिल्ली गाठली असून संभाव्य बंड रोखण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे समजत आहे.

स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात विलीन होणार?

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, हे खासदार प्रथम स्वतंत्र संसदीय गट स्थापन करू शकतात. त्यानंतर हा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही खासदारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा सुरू झाली असून ठाकरे गटातील काही लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सातत्याने केले जात आहेत.

फुटीच्या चर्चांमुळे ठाकरे गट सतर्क

संभाव्य फुटीच्या चर्चांनंतर ठाकरे गटाकडूनही हालचालींना वेग आला आहे. पक्षातील खासदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ नेते सक्रिय झाल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत हे देखील दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य बंड रोखण्यासाठी आणि खासदारांशी संवाद साधण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या 9 खासदारांबरोबर उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली होती. आता या संभाव्य फुटीमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे.

‘२०२९ पर्यंत ‘उबाठा’ पूर्णपणे संपणार’, एकनाथ शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’वरून बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

वर्धापन दिनापूर्वी राजकीय घडामोडींना वेग

येत्या काही दिवसांत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. अशा वेळी खासदार फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. जर या चर्चांमध्ये तथ्य आढळले, तर ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. दरम्यान, सध्या या सर्व घडामोडी राजकीय चर्चांच्या पातळीवर असून कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही.

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान

प्रताप सरनाईकांचे मोठे भाष्य

प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रवेशावर भाष्य करत म्हंटले कि, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्ते, शिवसैनिक, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस दरवाजे खुले आहेत. आजही एकनाथ शिंदे रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत जर आवडत असेल आणि त्यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत,” असे ते म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. मात्र मला वाटत कि प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे. ज्यांना आमच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची मनात इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी 24 यास 365 दिवस दरवाजे उघडे आहेत,” असे ते म्हणाले.

Web Title: Uddhav thackeray shiv sena ubt mps rebellion six mps may join shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
2

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
3

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
4

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.