७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम (फोटो सौजन्य-X)
परंतु अमरावती विभागातील सात नगर परिषद, नगर पंचायतींचे भवितव्य अंधारात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी आरक्षण ५० टक्क्यांवरून जास्त झाले आहे, त्या ठिकाणच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. या यादीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, चिखलदरा नगरपरिषद, धारणी नगरपंचायत, यवतमाळ जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा तसेच वाशिम जिल्ह्यातील एक नगरपरिषदेचा समावेश आहे.
५० टक्क्यांच्या पुढे: दर्यापूर नगरपरिषदेत, ओबीसींचे प्रमाण ६.७५ टक्के धरून ७ जागा राखीव ठेवल्याने एकूण आरक्षण ६४.७१ टक्के झाले आहे. चिखलदरा नगरपरिषदेत, एसटी आरक्षण थेट ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. मागील निवडणुकीत एसटीसाठी ३ जागा राखीच होत्या; यावेळी त्या ७ करण्यात आल्या. यात ओबीसी जागा ४ वरून ५ तर एससी जागा २ वरून ३ करण्यात आली आहे. धारणी नगरपंचायतीत, ओबीसीसाठी ४.५९ टक्केवारीच्या आधारे ५ जागा राखीव ठेवल्याने एकूण आरक्षण ६४.७१ टक्के झाले आहे.
नगर पालिका, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी वापरला नगराध्यक्ष फाम्र्म्युला जातो. आरक्षण चक्राकार असून अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला), इतर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय (महिला), सामान्य नंतर सामान्य (महिला) असा असते. हे क्रमवार फिरते पद्धतनं असते. समजा एक नगरपालिकेत २० जागा असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणे अनुसूचित जाती १० टक्के, अनुसूचित जमाती ५ टक्के, इतर मागासवर्गीय २७ टक्के तर सामान्यची उर्वरित जागा राहील. त्या फार्मूल्यानुसार अनुसूचित जातीसाठी २ जागा, अनुसूचित जमाती साठी १ जागा, ओबीसीसाठी ५ जागा तर सामान्यसाठी १२ जागा राहिल. या सर्वांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव म्हणजे १० जागा. (वर्गानुसार विभागल्या जातात).
“हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे यावर भाष्य करता वेगार नाही, अद्यापपर्यंत राज्य नगर पंवायत निवडणुकीच्या अनुषंगाने मिळालेल्या निर्देशानुसार अमंलबजावणी सुरु आहे. राज्य आयोगाकडून जे निर्देश प्राप्त होईल, त्याप्रमाणे कार्यवाही होईल असं मतं अमरावतीचे नगर पालिका प्रशासन, सहआयुक्त, विकास खंबारे यांनी व्यक्त केलं आहे.
Ans: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.
Ans: ३१ जानेवारीच्या आधी महापालिका निवडणुका होतील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर अखेरीस आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक एकाचवेळी होणार असल्याचे समजतेय.
Ans: महापालिका - 29, नगरपालिका - 246, नगरपंचायती - 42, जिल्हा परिषद - 32, पंचायत समिती - 336






