फोटो सौजन्य- istock
अंकशास्त्रानुसार, बुध हा 5 अंकांचा स्वामी ग्रह आहे. बुध ग्रहाचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर दिसून येईल. अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी लोक त्यांच्या बोलण्याने प्रभावित होतील. मूलांक 5 असणारे लोक कामात व्यस्त राहतील तसेच कामानिमित्त बाहेर प्रवास करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेले लोक नवीन कामाची सुरुवात करु शकतात किंवा व्यवसायात मोठा निर्णय घेऊ शकतात. काम करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी स्वतःमध्ये नेतृत्वाची भावना जाणवेल आणि ते प्रत्येक काम त्यांच्या बुद्धीने पूर्ण करतील. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी जुनी समस्या सोडवण्याची संधी मिळू शकते. तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील.
मूलांक 3 असलेले लोक सामाजिक कार्यात सहभाग घेऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. विदयार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असलेले लोक कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखतील. तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काहीही सांगण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा तणाव वाढू शकतो.
मूलांक 5 असलेले लोक आज कामात व्यस्त राहू शकतात. आज कामाच्या संदर्भात सहलीला जाण्याची किंवा नवीन संपर्कात येण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी जाण्याची योजना देखील आखू शकता.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी सजावट किंवा कामे करण्यात अधिक रस दाखवू शकता. सहकार्य आणि सुसंवादामुळे तुमचा दिवस शांत आणि आनंददायी जाणार आहे.
मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि मोठा निर्णय घेण्यासही मदत होऊ शकते. तसेच आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा दबाव येऊ शकतो. व्यावसायिकांनी आज आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तुम्हाला वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी देखील थोडा वेळ घालवू शकता. कोणताही निर्णय घेताना घाई करु नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)