फोटो सौजन्य- istock
एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या रचनेवरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जातो. जसे की, तुमची बोटे, कपाळ, चेहरा, पायांचे तळवे इत्यादी गोष्टींवरुन तुमचे व्यक्तिमत्व, स्वभाव याविषयी माहिती समजते. प्रत्येक व्यक्तीची संबंधित वैशिष्ट्ये त्याच्या कपाळाच्या रेषांवरुन समजतात. रुंद कपाळ, लहान कपाळ, गोल कपाळ यांसारख्या गोष्टींवरुन एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवले जाते. कपाळावरुन एखाद्याचे व्यक्तिमत्व कसे ओळखायचे, जाणून घ्या
व्यक्तीच्या कपाळाकडे पाहून त्यांची बुद्धिमत्ता कशी असेल, त्याला नशिबाची किती साथ आहे, त्याच्या जीवनात किती चढ उतार येणार आहे हे त्याच्या कपाळावरुन समजते. कपाळाची रुंदी, रंग, त्यावरील रेषा या सर्व गोष्टींच्या अंदाजावरुन त्याच्या भविष्याचा अंदाज घेतला जातो.
असे मानले जाते की, ज्या व्यक्तीचे कपाळ रुंद असते ती व्यक्ती जीवनामध्ये उच्च स्थान प्राप्त करते. तसेच ती व्यक्ती खूप बुद्धिमान समजली जाते. त्या व्यक्तीमध्ये काम करण्याचे कौशल्य असते. त्यासोबतच त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता देखील जास्त असते. त्या व्यक्तीला करिअरमध्ये यश मिळते आणि कमी वेळेमध्ये मोठ्या पदार्यंत हे लोक पोहोचतात.
या व्यक्तीचे कपाळ लहान असणे किंवा अरुंद असतात ही लोक कोणत्याही गोष्टीचे लवकर उत्तर देतात किंवा एखाद्या गोष्टीवर लवकर प्रतिक्रिया देतात. मात्र, या लोकांना सुरुवातीच्या काळमध्ये भरपूर संघर्ष करावा लागतो. अशा लोकांना कोणत्याही गोष्टींमध्ये लवकर यश मिळत नाही. बऱ्याचदा असे लोक एखाद्या विचारांवर लवकर आपले मत मांडत नाही. असे लोक खूप भावनिक असतात.
ज्या लोकांचे कपाळ वाकलेले असते ते धार्मिक असतात असे मानले जाते. अशा लोकांना पूजा, पाठ, पठण, धर्म, कर्म यांसारख्या गोष्टींमध्ये जास्त रस घेतात. या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. असे लोक आपल्या विचारांमध्ये गंभीर असतात. हे लोक न्यायाने चालणारे असतात त्यांना दुसऱ्यांवर होणारे अन्याय सहन होत नाही. जर एखाद्यावर अन्याय होत असतील तर ते त्याला प्रतिकार करु शकतात.
ज्या लोकांचे कपाळ झुकलेले असते असे लोक स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेले असतात. असे लोक भावनिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात. असे लोक एकाच विषयावर वेगवेगळ्या गोष्टींवर संवाद साधतात. अशा लोकांमध्ये नेहमी गोंधळाची स्थिती असू शकते. या लोकांमध्ये आपल्या विचारांची स्पष्टता नसते. हे लोक कोणतेही निर्णय घेण्यामध्ये उशीर आणि संकोच करतात.
ज्या व्यक्तीच्या कपाळाचा आकार M असतो त्या व्यक्ती कल्पनाशील, कलात्मक आणि सर्जनशील क्षमतेचे असलेले मानले जातात. अशा लोकांना कपडे परिधान करण्याची चांगली जाण असते, त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये सभ्यता असते. असे लोक इतर लोकांवर चांगली छाप पाडण्यात यशस्वी होतात. असे लोक वादविवादापासून दोन हात लांबच असतात. त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची तीव्र भावना असते. हे लोक स्वच्छ मनाचे देखील असतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)