फोटो सौजन्य- pinterest
बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि तर्कशास्त्र यासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह 2026 मध्ये तीन वेळा वक्री होणार आहे. या वक्रीचा परिणाम बुध ग्रहाच्या राशींवर होणार आहे. 2026 मध्ये बुध एकूण 69 दिवस वक्री अवस्थेत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या वक्री गतीचा तीन राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचा या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. बुध ग्रह प्रथम 26 फेब्रुवारी 2026 रोजी वक्री होईल आणि ही वक्री 21 मार्च 2026 रोजी संपेल. तर दुसऱ्यांदा वक्री 29 जून 2026 रोजी होणार आहे 24 जुलै 2026 पर्यंत ही वक्री राहील. तिसऱ्यांदा बुध 24 ऑक्टोबर रोजी वक्री होणार आहे जो 13 नोव्हेंबर रोजी संपेल. या वक्रीचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांना बुध राशीच्या वक्री गतीचा फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीमुळे चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि वाढीच्या संधी मिळतील. एखाद्या मोठ्या व्यवहारामुळे व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळू शकतो. व्यावसायिकांची मोठी डील होऊ शकते. संपत्तीच्या संबंधित फायदा होऊ शकतो. तुम्ही परदेशात प्रवास करु शकतात. तुम्हाला सर्व कामात अपेक्षित यश मिळेल.
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या राशीत याच्या वक्री गतीचा फायदा होणार आहे. तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. शेअर बाजारात तुम्हाला भरीव नफा दिसेल. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. तसेच तु्म्ही बचत देखील करु शकता. समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. सामाजिक मान सन्मान वाढेल.
बुध ग्रहाची वक्री गती कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. वाहन किंवा घर खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ असेल. शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. तुम्हाला गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 2026 मध्ये बुध वर्षातून तीन वेळा वक्री होणार आहे. प्रत्येक वक्री काळाचा प्रभाव वेगवेगळा पडेल.
Ans: जुन्या प्रकल्पांना गती मिळणे, अडकलेले काम पूर्ण, आर्थिक सुधारणा, बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
Ans: वृषभ, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांना बुध वक्रीचा फायदा होणार आहे






