फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीमध्ये आज सोमवार, 25 ऑगस्ट रोजी प्रवेश केला आहे. यामध्ये तो 13 सप्टेंबरपर्यंत रात्री या राशीत राहणार आहे. अनेक ग्रह यावेळी कन्या राशीमध्ये संक्रमण करत असल्याने मंगळ कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करेल. पंचांगानुसार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.28 वाजता चंद्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे चंद्र आणि मंगळ युती करणार आहे. 27 ऑगस्ट रोजी चंद्र कन्या राशीत संध्याकाळपर्यंत राहणार आहे. यामुळे त्याची होणारी ही युती लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. चंद्र आणि मंगळाच्या युती दरम्यान काही राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडू शकतो आणि जीवनामध्ये स्थिरता राहील.
पंचांगानुसार, काही राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह कन्या राशीत ऊर्जा, धैर्य, शौर्य, भूमी आणि क्रोधाचा कारक मंगळ, मन, आनंद आणि निसर्गाचा कर्ता चंद्र आणि यांची भेट शुभ राहील.
कन्या राशीमध्ये चंद्र आणि मंगळ असल्याने सिंह राशीच्या लोकांना या युतीचा लाभ होणार आहे. हा काळ व्यावसायिकांना प्रवास करण्यासाठी चांगला राहील. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना फायदा होऊ शकतो. तसेच व्यवसायामध्ये वाढ होईल. या काळात प्रेम जीवनाशी संबंधित असलेल्या समस्या संपू शकतात आणि लवकरच तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
चंद्र आणि मंगळाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नवीन नोकरीच्या शोधात आहे अशा लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. त्याचप्रमाणे व्यवसायिकांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करावे. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेत पूर्वीपेक्षा चांगले गुण मिळतील. मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. असे लोक नातवंडासोबत आपला वेळ घालवू शकतात.
चंद्र आणि मंगळाच्या युतीचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर शुभ होणार आहे. विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत चांगल्या सवयींचा समावेश करतील यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढेल. त्यांच्यामधील थकवा आणि अशक्तपणाच्या समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिकांना मानसिक शांती मिळेल. तरुण कुटुंबातील सदस्याच्या मदतीने स्वतःचे काम सुरू करू शकतात. या काळात तुम्ही लांबचा प्रवास करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)