फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 7 डिसेंबरचा दिवस. आज चंद्र मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये संक्रमण करेल. यामुळे आज गजकेसरी राजयोग आणि अनाफ योग तयार होणार आहे. तसेच वसुमान योग देखील तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ देखील कर्क आणि धनु राशीत संक्रमण करेल. यामुळे लक्ष्मी योग देखील तयार होईल. पुनर्वसु नक्षत्रामुळे शुक्ल योगाची युती होईल. अशा वेळी रविवारी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत मजा करण्याची संधी मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात लक्षणीय नफा होईल. तुम्ही आज मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. तुम्हाला जमीन आणि इमारतीच्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतील.
रविवारचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. सामाजिक क्षेत्रात आदराचा दिवस राहील. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना देखील आखू शकता. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला काही मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद मिळेल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. बुद्धिमत्तेचा आणि सर्जनशीलतेचा फायदा होईल. काही दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या चांगल्या बातम्या तुम्हाला आनंदित करतील. आजारी असलेल्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. तुम्हाला नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. कपडे आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. परदेशाशी संबंधित काम असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस चांगला राहणार आहे. सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला लाभ आणि आदर मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. एखाद्या शुभ कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात.
ममकर राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस उत्साहाचा राहील. आज तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही नियोजित केलेला कोणताही प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. सामाजिक कार्यात तुमची ओळख निर्माण होईल. तुमच्या घरी एखादा शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






