फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 1 नोव्हेंबरचा दिवस. आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र कुंभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि चंद्राच्या दुसऱ्या घरात असल्याने शुभ योग तयार होईल. गुरु ग्रह त्याच्या उच्च राशीत असल्याने हंस राजयोग तयार होईल. शतभिषा नक्षत्रामुळे ध्रुव योग आणि रवि योग तयार होईल. भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे आणि ध्रुव योग आणि रवि योगामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
शनिवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. तुम्ही नवीन संबंध तयार करु शकतात ते तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. जुन्या मित्राच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. भूतकाळातील कोणत्याही कामाचा तुम्हाला फायदा होईल. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकतात. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. तुम्ही घेतलेले कोणतेही कर्ज तुम्हाला परत मिळू शकेल. कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्हाला आर्थिक फायदे देखील होतील. तुमचे प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. सहकाऱ्याच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. दागिने आणि कपड्यांच्या व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर आणि प्रगतीशील राहील. पार्लर, दागिने आणि कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमचे मन अभ्यासावर केंद्रित राहील, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्याल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या योजनांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला काही तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. मालमत्तेच्या कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. घरे किंवा जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. व्यवसायामध्ये उत्पन्नात वाढ होईल. यावेळी तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोणतेही तणाव दूर होतील. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. परदेशातील भूमीतूनही तुम्हाला फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






