फोटो सौजन्य - Social Media
आज माघी गणेशोत्सव म्हणजेच गणरायाची जयंती! त्यामुळे आज गणेशाला घरी आणले जाते. या सणातही गणरायाला वाजत गाजत घरी आणले जाते आणि गणेश चतुर्थीवेळी ही मग या दोन्ही सणांमध्ये फरक काय? तर गणेश चतुर्थी हा सण, सर्वप्रथम भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. हा सण जल्लोषाचे प्रतीक आहे. एकंदरीत, या सणाची ओळखच जल्लोष आहे. पण माघी गणेशोत्सव हा जास्त अध्यात्मिक स्वरूपाचा सण आहे. माघी गणेशोत्सवात गणेशाच्या पूजेत कसलीही कमतरता राहत नाही कारण यात कोणताही प्रकारचे मोठा जल्लोष नसून केवळ भक्ती असते. दीड दिवसांच्या या गणपतीच्या सणात अध्यात शिघेला असते.
गणेश जयंतीच्या सणाला गणरायाला घरी आणले जाते, मग गणेश चतुर्थीलाही का आणले जाते?
गणेश जयंतीच्या सणाला गणेशाचे आगमन केले जाते, कारण तेव्हा गणपतीचा वाढदिवस असतो पण भाद्रपद महिन्यात गणेशा पृथ्वीवर आपल्या भक्तांमध्ये वास्तव्यास येतो अशी धारणा आहे. कोकणातही गौरी आणण्याचा असा समाज आहे की कोकणात गौरी माहेरपणासाठी येते, आणि त्या अगोदर बाप्पाही आलेला असतो. पाहुणचारासाठी मामाकडे आलेला बाप्पा! असा काही कथा कोकणात आजही ऐकवल्या जातात. त्यामुळे गणेश चतुर्थी या सणाला बाप्पाला घरी आणले जाते. लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक पातळीवर नेला आणि आज गणेश चतुर्थी मुंबईची खरी ओळख बनली आहे.






