फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला कधीतरी आयुष्यात सगळं थांबल्यासारखं वाटतं. पण अशा काही गोष्टी स्वप्नात दिसतात की ज्या मनाला दिलासा देतात. काही स्वप्ने खूप वेगळी असतात. कधीकधी ही स्वप्ने शुभ मानली जातात. आपण पाहत असलेली स्वप्ने केवळ झोपेशी संबंधित नसून आपल्या भविष्याशी आणि मानसिक स्थितीशी देखील संबंधित असतात. बऱ्याचदा ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी दिसणारी स्वप्ने विशेष शुभ मानली जातात. स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने ही शुभ असतात तर काही अशुभ. जाणून घ्या स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसल्याने तुमचे नशीब चमकू शकते.
जर तुम्हाला स्वप्नात तेजस्वी सूर्यप्रकाश दिसला असेल, तर ते शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतील.
जर तुम्ही स्वतःला थंडीने थरथर कापताना पाहणे म्हणजे तुमच्यासाठी चांगले लक्षण मानले जाते. काही जुनी रखडलेली काम आता पूर्ण होणार आहे. तुम्हाला आदर आणि यशदेखील मिळू शकते.
स्वप्नात पाल दिसणे हे विचित्र वाटू शकते पण हे स्वप्न खूप शुभ मानले जाते. या स्वप्नात तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती येणार आहे. तसेच, काही जुनी समस्या देखील संपणार आहे.
जर स्वप्नात कामावरुन काढून टाकताना स्वप्नात दिसत असल्यास घाबरुन जाऊ नका ते शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला पदोन्नती मिळणार आहे. तसेच तुमच्यासाठी कामावर नवीन जबाबदारीदेखील मिळू शकते.
जर तुम्ही स्वतःला टोपी घालताना पाहिले असेल तर ते शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची ओळख वाढणार आहे. लोक तुमचे शब्द गांभीर्याने घेतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल.
जर स्वप्नात स्वतःला बाजारात खरेदी करताना पाहणे खूप शुभ मानले जाते. याचा तुम्हाला आर्थिक दिलासा मिळणार असण्याचे हे स्वप्न सूचवते. शिवाय कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.
जर तुम्ही स्वतःला विमानात उडताना पाहिले असेल तर हे स्वप्न तुमच्या आयुष्यात मोठे बदल दर्शवू शकतात. हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि एक नवीन सुरुवात शक्य आहे.
स्वप्नात पहारेकरी दिसणे खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होण्याचे संकेत देते. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल असे सुचवते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)