फोटो सौजन्य-istock
हिंदू धर्मात सण-उत्सवाचे आगळे-वेगळे महत्व आहे. प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. गणपती पाठोपाठ गौरीचे आगमन झाले आहे. यंदा गौराईचं आगमन हे 10 सप्टेंबरला झालं आहे, तर बुधवार, 11 सप्टेंबरला गौराईचं पूजन केलं जाईल.
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रातांत गौरीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. तसेच गौरी आवाहन करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजनानिमित्त तुम्ही नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा.
हेदेखील वाचा- स्थापन केलेली छोटी गणेश मूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवू शकता का?
गौरी पूजन शुभेच्छा
आली आली गौराई
सोन पावलांच्या रुपाने
आली आली गौराई
धनधान्यांच्या रुपाने
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी,
उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी
आली गवर आली आली, सोनपावली आली
आली गवर आली आली, सोनपावली आली!
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
हेदेखील वाचा- पुष्कराज रत्न कोणी धारण करावे? जाणून घ्या नियम आणि फायदे
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवघी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
गौरी माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
हेच मागणं मागते तुला
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
सोन्याच्या पावली गौराई घरी आली,
आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली!
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेकी-सुनांची माय माऊली
देईल मायेची सावली,
आली गौराई माहेराला,
भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला
करा तिची मनोभावे सेवा
ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा
जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा आरतीची घाई,
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया,
घरा दारा लाभो आशीर्वादाची छाया
गौरी पूजनाच्या शुभेच्छा !
घागर घुमूदे घुमूदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंब-लोण करा
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!