फोटो सौजन्य- pinterest
ग्रहण काळामध्ये मन अस्थिर होते. मन एकाग्र राहत नाही आणि मानसिक ताण जास्त असतो. या काळामध्ये नोकरी आणि व्यवसायातही मोठ्या अडचणी येऊ शकतात. मात्र योगाचा कधीही शुभ राहणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी केतू आणि सूर्य ग्रहाची युती होते त्यावेळी ग्रहण योग तयार होऊन ते समृद्धी आणि आरामाचे वरदान देते. बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी केतु आणि चंद्र सिंह राशीमध्ये युती करणार आहे. केतु आणि चंद्रामुळे तयार होणाऱ्या ग्रहण योगाचा कोणत्या राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे, जाणून घ्या
चंद्र बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.35 वाजता सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे आणि शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 3.51 पर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. सिंह राशीमध्ये पहिल्यापासूनच केतू ग्रह उपस्थित असणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी केतू आणि चंद्राची युती होणार आहे आणि यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. हा योग शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे.
12 नोव्हेंबर रोजी ग्रहण योग तीन राशीच्या लोकांसाठी प्रभावित राहणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक स्थितीपासून आरोग्याच्या समस्यापर्यंत समस्या जाणवू शकतात.
मेष राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या योगामध्ये खर्चामध्ये अपेक्षित वाढ होईल. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या काळात एखाद्यासोबत वाद होऊ शकतात. अशावेळी सावध राहावे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे.
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग अशुभ राहणार आहे. तुम्हाला आरोग्याच्या संबंधित समस्या जाणवू शकतात. या काळात व्यवसायामध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते. सावध राहा.
ग्रहण योगामुळे मीन राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. कोणाशी तरी वादविवाद होऊ शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवायला हवे.
ग्रहण योगाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी महादेवांची आराधना करा. शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी अर्पण करा. त्यानंतर शिव चालिसा वाचा. त्यासोबतच गरीब आणि गरजूवंतांना काही गोष्टींचे दान करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होतो
Ans: केतू आणि चंद्र सिंह राशीमध्ये योग तयार करणार आहे
Ans: मेष रास, सिंह रास आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे






