फोटो सौजन्य- pinteres
यावर्षी हनुमान जयंती शनिवार, 12 एप्रिल रोजी आहे. नाशिकमधील अंजनेरी पर्वत हनुमानजींचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की हनुमानजींनी सूर्याला पकडण्यासाठी या ठिकाणी उडी मारली होती. हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही नाशिकला जाऊ शकता.
नाशिक त्याच्या धार्मिक आणि पौराणिक महत्त्वामुळे जगभर प्रसिद्ध आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरला कुंभनगरी असेही म्हणतात. नाशिकला त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भगवान रामचंद्रांनी त्यांच्या वनवासादरम्यान केलेल्या तपश्चर्येचे ठिकाण आहे.
बाल हनुमान नटखट होते. त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. बाल हनुमान घरात खेळत असतानाच त्यांना झाडावरील एक आंबा खायचा होता. पिवळा धमक दिसणारा तो आंबा कधी एकदा खातोय, असे त्यांना झाले होते. त्यासाठी त्यांनी आकाशात उंच झेप घेण्याचे ठरवले होते. पण ते चमकते फळ झाडाला नाही तर आकाशाला लागलेले होते. पण ते चमकते फळ झाडाला नाही तर आकाशाला लागलेले होते. बाल हनुमान जो हट्ट करत होते ते सूर्याला खाण्याचा होता. यासाठी त्यांनी उंच आकाशात झेपही घेतली. ती झेप ज्या डोंगरावरुन घेतली तो डोंगर आपल्या महाराष्ट्रात आहे.
हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी डोंगरावर झाला. अंजनेरी हे नाव हनुमानाच्या आईच्या अंजनी मातेच्या नावावरुनच पडले असल्याचे म्हटले जाते. त्र्यंबकेश्वरमधील पर्वत रांगेतील अंजनेरी महत्त्वाचा पर्वत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत 4,200 फूट उंच अंजनेरी पर्वत आहे. या पर्वताचे दर्शन घेण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर 20 कि.मी अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. या गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गावात जाता येते. तसेच मुळेगावच्या वाटेनेही गावात जाता येते.
या मूलांकांच्या लोकांना घाईघाईत घेतलेल्या निर्णयांसाठी मोजावी लागेल मोठी किंमत
अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळील गुहेमध्ये जैन धर्मीय लेणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर येते. मंदिर प्रशस्त असून, तिथे मुक्काम करण्याची देखील सोय आहे.
बालपणी नटखट असलेले बाल हनुमान. त्यांचा पराक्रमांना बालपणही रोखू शकले नाही. अगदी अजाणत्या वयातही त्यांनी सूर्याकडे झेप घेण्यासाठी आकाशात झेप घेतली होती. तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा या अंजनेरी पर्वतावर आहे. तिथे एक तळे असून त्याचा आकार मानवी पायासारखा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)