फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 5 सप्टेंबर महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. चंद्राचे संक्रमण शनिच्या मकर राशीमध्ये दिवसरात्र होणार आहे. चंद्र आणि शुक्र एकमेकांसोबत संसप्तक घरामध्ये राहून कालयोग तयार करतील. काल श्रावण नक्षत्राच्या युतीमुळे रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शोभन योग या योगाची युती होणार आहे. महादेव आणि देवी लक्ष्मी यांच्या आशीर्वादामुळे आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअर आणि कामाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कामाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांना चांगला लाभ होईल. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. अडकलेले कोणतेही काम वेळेत पूर्ण होऊ शकते. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही या काळात वस्तूंची खरेदी करु शकता.
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस शुभ राहील. तुमचीही कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करु शकता त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या शब्दांचा आणि कौशल्यांचा फायदा होईल. तुमच्या जोडीदारासोबत कोणतेही काम केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन तुमच्यासाठी फायदेशीर राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा राहील. या काळात तुमच्या अनेक चिंता दूर होतील. करिअरच्या दृष्टिकोनातून तुमचा आजचा दिवस सकारात्मक राहील. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून अपेक्षित यश मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. व्यवहारांच्या बाबतीत तुमचा आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होईल. भेटवस्तू आणि कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच तुमच्यावर कोणत्याही महत्त्वाच्या जबाबदारी येऊ शकते. जे लोक वाहन, घर किंवा जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. तुम्हाला अल्पकालीन गुंतवणुकीतूनही चांगला फायदा मिळू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)