फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला न्यायाचे प्रतीक मानले जाते. शनि हा एकमेव ग्रह आहे जो हळूहळू चालतो, म्हणून त्याचा प्रभाव दीर्घकालीन असतो. अलिकडेच, सुमारे अडीच वर्षांनी, शनिने आपली राशी बदलली आहे आणि गुरूच्या मीन राशीत प्रवेश केला आहे आणि आता तो 2027 पर्यंत या राशीत राहील. यावेळी, शनिच्या इतर ग्रहांशी युती किंवा दृष्टीमुळे अनेक विशेष योग तयार होतील, जे जीवनाच्या विविध क्षेत्रांवर परिणाम करतील.
त्याचप्रमाणे सोमवार, 9 जून रोजी दुपारी 4.16 वाजता शनि आणि बुध यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होणार आहे, ज्यामुळे केंद्र योग निर्माण होईल. यावेळी, शनि मीन राशीत असेल आणि बुध मिथुन राशीत असेल. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. जेव्हा शनिसोबत केंद्र योग तयार करतो तेव्हा तो विशेषतः शुभ ठरू शकतो. या योगाचा काहीं राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडतो. ज्याचा परिणाम त्यांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, शिक्षणात यश आणि कौटुंबिक जीवनात संतुलनावर होऊ शकतो. केंद्र राज योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार लाभ, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला असणार आहे. शनि अकराव्या घरात आहे तर बुध दुसऱ्या घरात असल्याने तुमच्यासाठी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. विदयार्थ्यांना या योगाचा फायदा होणार आहे. या योगामुळे विद्यार्थ्यांमधील एकाग्रता वाढेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता देखील आहे. जीवनातील अनेक जुन्या समस्या सुटतील.
मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध यांचा केंद्र योग अत्यंत शुभ असू शकतो. शनि तुमच्या तिसऱ्या घरात आणि बुध सहाव्या घरात भ्रमण करत आहे. ज्यामुळे धैर्य, कठोर परिश्रम आणि समजूतदारपणा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल त्याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षांमध्येदेखील त्यांना या योगाचा फायदा होणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या राशीच्या लोकांचा धार्मिक कार्ये आणि अध्यात्माकडे कल वाढू शकतो.
शनि आणि बुध ग्रहांचे हे संयोजन कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरु शकते. या राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव दिसू शकतो. ज्यांना बऱ्याच काळापासून अडचणी येत आहेत त्यांना आता आराम मिळू लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)