फोटो सौजन्य- istock
जीवनात भरपूर यश, सुख-समृद्धी आणि पैसा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. पण अडचणी, अपयश, तोटा हा देखील जीवनातला अविभाज्य भाग आहे. जेव्हा जीवनात या गोष्टींची तीव्रता वाढते तेव्हा बहुतांश लोक अध्यात्म, ज्योतिष, वास्तुशास्त्र किंवा सामुद्रिकशास्त्राचा आधार घेतात. रत्नशास्त्र हा ज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रहानुसार त्याची रत्नं आणि उपरत्न निश्चित असतात. जीवनात चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी जाणकार एखाद्या ग्रहाचं रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. नीलम हे त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण रत्न आहे. या रत्नाची खासियत जरा निराळी आहे. हे रत्न सर्व राशींना लाभदायक ठरतं असं नाही. त्यामुळे नीलम धारण करण्यापूर्वी जाणकार किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या शांतीसाठी रत्न धारण केले जातात. शनि ग्रहाला शांत करण्यासाठी, नीलम घालण्याची शिफारस केली जाते. हे रत्न धारण करणाऱ्यांना आर्थिक लाभ होतो. याशिवाय हे रत्न धारण करणारे लोक नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, नीलम रत्न परिधान केल्याने प्रथम कुंडलीचा विचार करणे आवश्यक आहे, कारण जर रत्न तुमच्यासाठी प्रतिकूल असेल तर तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. नीलम रत्नाबद्दल जाणून घेऊया.
नीलम रत्नाचे फायदे
ज्यो लोकांना नीलम रत्न शुभ असतात त्यांना लगेच फायदे दिसू लागतात.
हेदेखील वाचा- 2BHK मध्ये असे ठेवा सामान की दिवाळीसाठी उरेल भरपूर जागा, सोप्या टिप्स
आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
आर्थिक नफा सुरू होतो.
नोकरी आणि व्यवसायात प्रगती सुरू होईल.
जर नीलम रत्न अशुभ असेल तर तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आर्थिक नुकसान होऊ शकते.
मोठा अपघात होऊ शकतो.
नीलम तुमच्यासाठी शुभ आहे की नाही हे कसे ओळखावे.
हेदेखील वाचा- महाशांती होम म्हणजे काय? तिरुपती प्रसाद वादानंतर विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नीलम रत्न परिधान करण्याच्या पहिले उशीखाली ठेवून झोपा. जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडत नसेल आणि चांगली झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की हे रत्न तुमच्यासाठी शुभ आहे. जर तुम्हाला गाढ आणि शांत झोप येत नसेल तर हे रत्न धारण करू नका.
रत्न धारण केल्यानंतर काही अशुभ घटना घडल्यास ते ताबडतोब काढून टाकावे.
नीलम रत्न धारण कसे करावे
नीलम रत्न खरेदी करताना लक्षात ठेवा की ते साडेसहा किंवा साडेसात कॅरेटचे असावे. तसेच शनिवारी हे रत्न धारण केल्याने विशेष लाभ होतो. नीलम पंच धातू किंवा चांदीच्या धातूमध्ये घालता येते. हाताबद्दल बोलायचे तर ते मधल्या बोटात घातले पाहिजे. नीलम रत्न धारण करण्यापूर्वी अंगठी गाईच्या दुधाने किंवा गंगाजलाने शुद्ध करून ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून धारण करा.