भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशात द्विपक्षीय व्यापारावर चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट
हैदराबाद येथे पंतप्रधान मोदी आणि लुला दा सिल्वा यांच्या द्विपक्षीय करारावर चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार यांसारख्या विषायांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार १५. २ अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत तो २० अब्ज डॉलरपर्यंत पुढे नेण्यावर सहमती दर्शवण्यात आली. दिल्लीतील ब्राझीलच्या पहिल्या ट्रेड ऑफिसचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.
द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि ब्राझीलमध्ये खनिज पुरवठ्यांवर एक महत्वपूर्ण सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या करारावर चर्चा सुरु आहे. हा करारा भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहे.
याशिवाय दोन्ही देशांतील विमान निर्मिती चर्चा देखील अंतिम टप्प्यात आहे. ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेअर आणि भारतातील अदानी आणि महिंद्रा समूहांमध्ये सध्या संरक्षण आणि विमाना वाहतूक नियंत्रणावर सध्या चर्चा सुरु आहे.
याशिवाय दोन्ही देशांतील व्हिसा प्रणालीवरही चर्चा झाली आहे. या चर्चेतून भारतीयांसाठी १० वर्षासाठी मल्टीलेयर व्हिसा प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष लुला यांनी भारताच्या प्राचीन वारशाचा देखील गौरव केला. द्विपक्षीय चर्चेपूर्वी अध्यक्ष लुला यांनी एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भाग घेतला होता. यावेळी त्यांनी भारताच्या गणितीय इतिहासाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, २००० वर्षांपूर्वी भारतीय गणितज्ञांनी विसित केलेली बायनरी सिस्टन आज आधुनिक संगणाचे भाग बनली आहे. यामुळे डिजिटल युग मायदेशी परतले असल्याचे त्यांनी म्हटले.






