फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये मंगळवारचा दिवस हा हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची पूजा करणे, मंदिरात जाणे आणि हनुमान चालिसा वाचणे हे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळवारी करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. ज्यामुळे व्यक्तीला जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होते आणि मंगळ दोषही दूर होतो. मंगळ ग्रहांचा संबंध गुळाशी असल्याचे मानले जाते. मंगळवारी योग्य विधी आणि भक्तीसह गुळाचे उपाय केल्याने आर्थिक समस्यावर मात करता येते. यामुळे तुमच्या जीवनातील दुःख दूर होण्यास मदत होते. मंगळवारी गुळाचे कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या
मंगळवारी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर विधिवत हुनुमानांची पूजा करावी. त्यानंतर माकडांना चणे किंवा गूळ खायला द्यावे. मंगळवारी हा उपाय केल्याने बजरंगबलीचा तसेच शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. तसेच कुंडलीत मंगळ बलवान असल्याने धैर्य आणि शौर्य देखील वाढते. तसेच आर्थिक समस्यांमधून सुटका होते. त्यासोबतच नशिबाची साथ देखील मिळू शकते.
मंगळवार आणि वैकुंठ चतुर्दशी असा शुभ योग 4 नोव्हेंबर रोजी जुळून आलेला आहे. विधीनुसार पूजा आरती झाल्यानंतर गूळ मिसळलेल्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक केल्यास त्याचा आपल्याला फायदा होतो आणि महादेवांचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यामुळे दुर्दैव दूर होते. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते.
मंगळवारी गूळ आणि नारळाच्या शेवग्याचे मिश्रण तयार करा. त्यानंतर नारळाच्या वरून एक छोटासा भाग कापून त्यात शेवग्या भरा. कापलेल्या टोकाचा वापर करून नारळ झाकून मातीमध्ये गाडा. नारळ मातीत दाबा जेणेकरून नारळाचा वरचा भाग थोडासा उघडा राहील. असे मानले जाते की, ज्यावेळी मुंग्या हा भुसा खातात त्यावेळी व्यक्तीच्या जीवनात चांगला काळ येतो. तसेच संपत्ती आणि समृद्धी देखील वाढते. तसेच एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती मजबूत होते.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे अशा लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. दरम्यान मंगळाचे परिणाम दूर करण्यासाठी आणि मंगळ दोष दूर करण्यासाठी गुळाचा हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरु शकतो. गुळापासून गोड भाकरी बनवून गाईला खायला द्या. असे केल्याने व्यक्तीला मंगळ दोषापासून सुटका होते आणि जीवनामध्ये आनंद येतो. मंगळवारी गुळाचा उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती होते आणि व्यवसायातही अपेक्षित प्रगती होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






