फोटो सौजन्य- pinterest
ग्रह वेळोवेळी आपले राशी आणि नक्षत्र बदलत असतात. यावेळी ग्रहाचा राजा सूर्य गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी विशाखा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. विशाखा नक्षत्राचा स्वामी देवांचा गुरु आहे आणि देवगुरूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. देव दिवाळीचा सण 5 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. लगेच सूर्य आपले नक्षत्र बदलेल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य शक्ती, ऊर्जा, यश, सन्मान आणि उच्च पदाचे प्रतिनिधित्व करतो. ज्यावेळी कुंडलीमध्ये सूर्य बलवान असतो त्यावेळी व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांना सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा होणार आहे. दिवाळीपासून मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळणार आहे. 2026 चे नवीन वर्ष या राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असणार आहे. दिवाळीपासून मिथुन राशीच्या लोकांना नेहमी नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नवीन वर्षात कुठेतरी बाहेर जाण्याची योजना तुम्ही आखू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना शत्रूंपासून मुक्तता मिळेल आणि सासरच्या लोकांशी त्यांचे संबंध अधिक दृढ होतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी नक्षत्र बदल खूप फायदेशीर राहणार आहे. सूर्य स्वतः सिंह राशीचा स्वामी हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम असणार आहे. जे नवीन वर्ष 2026 पर्यंत असणार आहे. तुमचे सर्व तणाव हळूहळू कमी होतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होईल. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता आणि सूर्याच्या आशीर्वादाने तुमचे ज्ञान वाढेल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेऊ शकाल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ असणार आहे. या काळात तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहे त्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकला असाल तर तुम्हाला या काळात योग्य दिलासा मिळेल. तुमच्या घरामध्ये शुभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अनुकूल राहणार आहे. या काळात कुंभ राशीचे लोक इतरांना मदत करण्यात आघाडीवर असतील आणि धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. जे लोक बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्या या काळात इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी, ऑफिसचे वातावरण अनुकूल राहील आणि तुमच्या वरिष्ठांच्या सहकार्याने तुमची अनेक उद्दिष्टे साध्य होतील. उद्योग, व्यापार, व्यवसाय, वाहतूक आणि बांधकाम क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






